मुंबई - सिटी सर्व्हे नंबर १९७ मध्ये प्रस्तावित शासकीस रूग्णालय होणार आहे. त्याबाबत, मुंबई महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी. मालाड येथील एम. एच. बी. कॉलनी येथे प्रशांत सुतार यांनी रेशनिंग दुकानामध्ये अनधिकृत धान्य विक्री होत असल्याची तक्रारीची चौकशी करून त्यावर तातडीने कारवाई करावी. एस. आर. ए.ने साठ दिवसात मनोजकुमार विश्वकर्मा यांच्या घराचा प्लॅनमध्ये समावेश करावा अशीही मागणी केली आहे. मालाड परिसरात रोहिंगे यांची वाढत असून शासनाने यावर तोडगा काढावा या मिथलेश सिंग यांनी दाखल केलेल्या या तक्रारीबाबत उच्चस्तरीय समिती नेमण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
पालकमंत्री आपल्या भेटीला - नागरिकांनी ४५२ विविध विषयांवर आपले तक्रार अर्ज दिले. तर यामधील ९६ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. पी, नॉथ वॉर्ड, मालाड (पश्चिम) येथे आज पार पडलेल्या 'पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, राजहंस सिंग, नगरसेवक जया तीवाना, विनोद मिश्रा, गणेश खानकर यासह विभागाचे अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्थव महाविद्यालय परिसरात फर्निचर दुकानांमुळे नागरिकांना ये-जा करताना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूकीला तसेच नागरिकांना प्रवास करताना अडचण येवू नये याबाबत तोडगा काढण्याच्या सूचना मंत्री लोढा यांनी केल्या आहेत. तसेच, रमाशंकर सिंह यांचे रस्ता दुरुस्तीमध्ये मुंबई महापालिकेने घर हटवले आहे. मात्र, अद्यापही मुंबई महापालिकेने पुन्हा नवे घर दिलेले नाही. तरी रमाशंकर सिंह यांना त्यांचे घर मिळवून देण्यासाठी खासदार गोपाळ शट्टी स्वतः लक्ष देणार आहेत, अशी ग्वाही खासदार शेट्टी व पालकमंत्री यांनी तक्रारदार रमाशंकर सिंह यांना दिली आहे.