मुंबई - राज्यात वाढत्या कोरोणा प्रादुर्भावाच्या पाश्वभुमीवर मंत्रीमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत येत्या शुक्रवारी (13 मार्च) विधिमंडळाचे अधिवेशन स्थगीत करण्याचा विचार करण्यात आला आहे. याबाबत पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची दुपारी २ वाजता बैठक होऊन सर्व सहमतीने निर्णय घेतला जाणार आहेत.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५ वर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलवली होती. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज किती दिवस चालू ठेवायचे यावर चर्चा करण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर गुंडाळणार असल्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वी मंजूर होणे आवश्यक असल्याचे सांगितले अन्यथा, लेखानुदान मांडावे लागेल असे ते म्हणाले.
बैठकीनंतर विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. खटुवा समितीच्या शिफारशीनुसार राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ होणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधानसभेत सांगितले. आवश्यकता भासल्यास यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करून निर्णय घेऊ असेही परब म्हणाले.
विधिमंडळाचे दोन आठवडे पूर्ण झाले असून, शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर अंर्थसंकल्पावरती चर्चा होऊन विभागनिहाय अनुदान मागण्यांवर विधानसभेत चर्चा होणे अपेक्षीत आहे. मध्यप्रदेशात झालेल्या राजकीय उलथापालथीचा परिणाम देखील विधिमंडळ कामकाजावर होणे अपेक्षीत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पाचवर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. दरम्यान, करोनाचे सावट अधिवेशनावर देखील आहे. त्यासाठी सकाळी विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज किती दिवस चालू ठेवायचे यावर चर्चा केली जाणार आहे. अर्थसंकल्पिय अधिवेशन लवकर गुंडाळणार असल्याची शक्यता आहे.