मुंबई - गेली पाच वर्षे उत्तर प्रदेशमध्ये जनतेच्या भावनांशी खेळण्याचा काम भारतीय जनता पक्षाने ( BJP in UP ) केले आहे. धर्माच्या आधारावर एका विशिष्ट वर्गाचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न तेथे झाला. मात्र, आता हे उत्तर प्रदेशमधील जनतेच्या लक्षात असल्यामुळे अशा राजकारणाला जनता नाकारणार, असे मत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांनी व्यक्त केले आहे. ( Nawab Malik Criticized BJP over UP Election 2022 )
काय म्हणाले मंत्री नवाब मलिक?
उत्तरप्रदेशातील दलित, शोषित, शेतकरी आणि ओबीसी वर्ग राज्य सरकारच्या विरोधात आहे. भारतीय जनता पक्ष ज्याप्रकारे उत्तरप्रदेश मध्ये धर्माच्या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला जनता नाकारणार आहे. 1993साली उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनमत तयार झाले होते. तशी परिस्थिती आता ही असून उत्तर प्रदेशची जनता भाजपला नाकारेल, असा विश्वास मंत्री नबाव मलिक यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - Ajit Pawar On Lockdown : "... तर लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री कठोर निर्णय घेण्याची शक्यता", अजित पवारांचा इशारा
गोव्यात अद्याप कोणाशीही युती नाही -
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर त्यापैकी तीन राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक लढवणार आहे. यापैकी मणिपूर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस सोबत निवडणूक लढवणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, अद्याप गोव्यामध्ये कोणत्याही पक्षासोबत युती झाली नसल्याचंही नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.