ETV Bharat / state

Wafers Pav : युपीच्या तरुणाचा वेफर्सपाव देतोय मुंबईच्या वडापावला टक्कर - मुंबईचा वडापाव महागला

'सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा वडापाव देखील आता मागणार' अशा आशयाच्या बातम्या येऊ ( Vada Pav Price Increase) लागल्या. पण, मुंबईत असे काही जुगाडू लोक आहेत. जे एकापासून दुसराच काहीतरी पदार्थ तयार करतात. त्याची चव देखील तितकीच चांगली असते. असाच काहीसा प्रकार केलाय व्यवसायासाठी उत्तर प्रदेश मधून मुंबई झालेल्या आलेल्या एका ( UP boy New Invention) तरुणाने.

wefars pav
वेफर्सपाव
author img

By

Published : Nov 16, 2022, 12:48 PM IST

मुंबई : एका बाजूला बटाटा, खाद्य तेल, बेसन, LPG गॅसचे दर वाढल्याने मुंबईतील वडापाव दुकानदारांनी एकत्र येत वडापावचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माध्यमांमध्ये 'सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा वडापाव देखील आता मागणार' अशा आशयाच्या बातम्या येऊ ( Vada Pav Price Increase ) लागल्या. पण, मुंबईत असे काही जुगाडू लोक आहेत. जे एकापासून दुसराच काहीतरी पदार्थ तयार करतात. त्याची चव देखील तितकीच चांगली असते. असाच काहीसा प्रकार केलाय व्यवसायासाठी उत्तर प्रदेश मधून मुंबई झालेल्या आलेल्या एका ( UP boy New Invention) तरुणाने.

वेफर्सपाव

बिट्टूचा झाला बिट्टू भाई : तर, विषय असा आहे मुंबईच्या दादर पूर्वेकडील नायगाव येथे उत्तर प्रदेशवरून आपला व्यवसाय करण्यासाठी आलेल्या बिट्टू गुप्ता या बावीस वर्षे तरुणाने एक छोटं सँडविच आणि स्ट्रीट बर्गरच दुकान सुरू केले. या दुकानाला बिट्टू ने फूड डूड्स असे नाव दिले आहे. बिट्टू गुप्ता त्याच्या वेफर्स पावमुळे ( UP boy Bittu Bhai wafers pav ) शाळेच्या मुलांपासून ते महाविद्यालयीन तरुणांमध्ये इतका फेमस झालाय की बिट्टू चा सध्या 'बिट्टू भाई' झालाय. मुंबईच्या खवय्यांसाठी वेफर्स पाव हा नवीनच पदार्थ घेऊन आलेला बिट्टू फक्त दहावी पास आहे. दहावीनंतर त्याने आयटीआयचा कोर्स केला पण त्याच्यात त्याचं काही मन रमले नाही. अखेर इतरांप्रमाणेच त्यांन देखील मुंबईचा रस्ता पकडला आणि मुंबईत येऊन वेफर्स पावचा प्रयोग केला.

कसा सुचला हा वेगळाच पदार्थ? : आपल्या मराठीमध्ये 'गरज ही शोधाची जननी आहे' असा एक सुविचार आपण शाळेपासून ऐकत आलोय. बिट्टू सोबत देखील असेच काहीसे झाले आहे. याबाबत बोलताना बिट्टू सांगतो की, "एक दिवस दुकान बंद करायला खूप उशीर झालेला. मी दुकानातच झोपत असल्याने तेच माझे घर आहे. जेवण बनवायला देखील वेळ नव्हता. कारण, रात्र खूप झाली होती. पण, भूक लागलेली असल्यामुळे दुकानातील पाव घेतले त्यावर काही चटण्या सॉस लावले आणि दुकानातलेच वेफर्स त्याच्यावर टाकले हा पाव थोडा गरम गेला आणि खाल्ला. त्याची चव मला आवडली पण माझ्यासोबत माझ्या मित्राला देखील आवडली."

बिट्टूचे प्रयोग : त्यादिवशी मित्राने बिट्टूला हा पदार्थ विकण्याची आयडिया ( how to make wafers pav ) सुचवली. पण, फक्त त्याला आणि त्याच्या मित्राला आवडलेला पदार्थ इतरांना देखील आवडले की नाही? असा प्रश्न बिट्टू समोर होता. पण, मेहनती बिट्टूने काही दिवस हा वेफर्स पाव लोकांना टेस्टसाठी फ्री मध्ये वाटण्यास सुरुवात केली. तो दुकानात सँडविच, शेवपुरी खायला येणाऱ्या ग्राहकांना वेफर्स पाव देखील असाच फ्री मध्ये देत होता. वेफर्स पाव खाणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायचा. हळूहळू सँडविच आणि शेवपुरी पेक्षा लोक त्याच्या वेफर्स पावची मागणी करायला लागले. आणि गरजेतून निर्माण झालेला हा वेफर्स पाव आता मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये आवडीचा पदार्थ बनलाय.

वेफर्स पावसाठी इतकी लाईन : स्नॅक्स टाईममध्ये या बिट्टूच्या वेफर्स पावसाठी इतकी लाईन असते की जवळपास 20 मिनिटे लोक वेटिंगवर थांबतात. इतका हा वेफर्स पाव फेमस झाला आहे. इतक्यावरच न थांबता बिट्टूला पुढे जाऊन स्वतःचा कॅफे सुरू करायचा आहे. त्यासाठी तो प्रयत्न देखील करतोय. बघू बिट्टूच्या या प्रयत्नांना यश येत आहे का? पण उत्तर प्रदेशहुन मुंबईत आलेल्या या बिट्टू गुप्ताचा हा वेफर्स पाव मुंबईच्या प्रसिद्ध वडापावला टक्कर देतोय हे मात्र नक्की.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.