मुंबई : आज महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथी दिनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत (painting in Ministry main building) तैल चित्राचे अनावरण झाले (Unveiling of oil painting of Mahatma Jotirao Phule) आहे. मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत. ज्यांनी सामाजिक क्रांती घडवली आणि ज्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी लढा दिला त्यांच्या प्रतिमा असाव्यात, अशी मागणी होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी विशेष लक्ष घालून ही मागणी पूर्ण केली. राजेश सावंत यांनी हे चित्र तयार केले.
तैलचित्राचे अनावरण : महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र मंत्रालयात मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात यावे, अशी मागणी सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर, मंत्रालयाच्या आवारात तैलचित्र दिसले. आता ती मागणी पूर्ण झाली असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे (Mahatma Jyotiba Phule and Savitribai Phule) अनावरण करण्यात आले. चित्रकार राजेश सावंत यांनी तयार केलेल्या तैलचित्राचे आज सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण (death anniversary of Mahatma Jotirao Phule) झाले.
छगन भुजबळांच्या पाठपुराव्याला यश : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अनेक वर्षे सातत्याने महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत लावण्यात यावे, अशी मागणी केली होती. सध्या मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र समोरच लावण्यात आले आहे. या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करून प्रत्येक जण मंत्रालयात आपल्या कामासाठी प्रवेश करत असतो.