ETV Bharat / state

मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी; राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस - अवकाळी पाऊस

Heavy Rain In Mumbai : मुंबई, पालघर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांसाठी हवामान खात्यानं महत्त्वाचा इशारा जारी केलाय. येत्या 3 ते 4 दिवसात मुंबई, पालघरसह कोकणच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Heavy Rain In Mumbai
Heavy Rain In Mumbai
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 9:21 PM IST

मुंबई Heavy Rain In Mumbai : रविवारी सायंकाळी राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. मुंबईसह पालघरमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली. पुढील चार दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. 26 नोव्हेंबर तसंच 27 नोव्हेंबरला मुंबईत 'यलो अर्लट'चा इशारा देण्यात आलाय. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता असल्याने त्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.

अवकाळी पावसाचा अंदाज : राज्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही काही ठिकाणी पावसाचं आगमन झालंय. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. त्यामुळं नागरिकांना हिवाळ्यात पावसाचा अनुभव मिळत आहे. तसंच हवामानातील बदलामुळं आजारांचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतंय. 25 ते 28 नोव्हेंबर या तीन दिवसात अवकाळी पावसाचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईतील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली होती. मुंबईतील पावसामुळं हवेतील प्रदूषण कमी होईल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. मुंबईतील वसई, विरार, नालासोपारा परिसरात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे.

पावसामुळं वीजपुरवठा खंडित : काही ठिकाणी पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित झाला होता. पावसामुळं वातावरणात दव निर्माण झालं असून, अनेकांना घशाचा त्रास होत आहे. त्यामुळं दुष्काळानं होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळालाय. दुसरीकडं कल्याणमध्ये विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस सुरू आहे. राज्यभरात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती. मुंबईतील अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड परिसरात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. शहापूरमध्येही अवकाळी पाऊस पडला.

हेही वाचा -

  1. साताऱ्याला अवकाळी पावसाने झोडपलं, राजवाडा चौपाटी जलमय; पाहा व्हिडिओ
  2. unseasonal rain in Nanded : वादळी वाऱ्यामुळे नांदेडमधील केळी बागा पडल्या आडव्या; सरकारकडे शेतकऱ्यांची मदतीची हाक
  3. Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांनो मशागतीला लागा; 'हे' वर्ष शेतीसाठी सुगीचे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.