मुंबई- माहिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माहिम समुद्रकिनारी एका बॅगमध्ये अज्ञात व्यक्तीचे तुकडे केलेले अवयव आढळून आल्याने खळबळ माजली आहे.
सोमवारी संध्याकाळच्या वेळेस माहिम समुद्रकिनारी एक बेवारस सुटकेस किनाऱ्यावर वाहत आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. पोलिसांनी सुटकेस उघडून तपासणी केली असता त्यामध्ये एक हात व एक पाय असलेले अवयवाचे तुकडे पोलिसांना आढळून आले आहेत. हे अवयव महिलेचे आहेत की पुरुषाचे याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, पोलिसांना सुटकेसमध्ये मिळालेला हात आणि पायाचे तुकडे हे शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहेत. दरम्यान, या व्यक्तीच्या इतर अवयवांचा शोध पोलीस घेत आहेत.