मुंबई : तृप्तराज पंड्या ( Triptaraj Pandya ) पंधरा महिन्याचा होता. तेव्हा रात्री अचानक दीड वाजेला त्याने बेडरूममध्ये आई आणि बापाकडे एक आग्रह धरला. त्याला बोलता येत नव्हते. मात्र त्याने खूण करून बेडरूम मध्ये छोटासा ना दुरुस्त तबला दे असे आईला सांगितले. मात्र दीड वाजला आणि झोपण्याची वेळ होती. दीड वर्षाच्या मुलाला तबला द्यायचा तोही रात्री, मात्र आई शेवटी आई असते. आईने बाळाचा हट्ट पुरवला आणि तृप्तराजला वाजवायला दिला. त्याच्या आईने गुजराती भजन म्हटले आणि तृप्तराजने बरोबर ताल धरला आणि सम मात्रेवर येऊन थांबला. आता त्याच्या आई वडिलांना त्याच्या सुप्त गुणांची चाहूल लागली. तृप्तराज आज सोळा वर्षाचा आहे. आता तृप्तराज इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड विजेता विद्यार्थी आहे. जाणून घेऊया सविस्तरपणे मराठी आणि गुजराती अशा दोन्ही संस्कारात तृप्तराज वाढलेला आहे.
पंधरा महिन्याचा असताना तबल्यावर धरला ताल : गुजरातमधील बामणा गाव, जिल्हा साबरकांड या ठिकाणी सरस्वती पंड्या यांचे चिरंजीव अतुल पांड्या यांना लहानपणापासूनच श्रीकृष्णाच्या भजनांची सवय होती. जुन्या हिंदी चित्रपट गीतांची एक आवड होती, तो संस्कार होता. त्यामुळे त्यांनी घरामध्ये देखील पूत्राच्या जन्माच्या आधीपासून संगीत आणि भजन याची आवड जोपासली. त्याचा परिणाम असा झाला की, तृप्तराज पंड्या जन्माला आला आणि अवघ्या पंधरा महिन्याचा असताना त्याने रात्री तबलावर ताल धरला. त्याच्या आईने भजन म्हटले. त्यामुळे वडिलांना आईंना चक्रावून टाकणारी ही घटना नंतर पुढे या जागतिक आणि भारतीय विक्रमापर्यंत येऊन ठेपली याची त्यांना देखील कल्पना नव्हती.
कमी वयात उत्कृष्ट तबलावादन : तृप्तराज जज जसा मोठा होऊ लागला मग आई-वडिलांना लक्षात आले की ,याला तबल्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. त्यामुळे याला आई-वडिलांनी खास तबला आणून दिला. तबला शिकणे फक्त तृप्तराज ने सुरू केले. परंतु तोपर्यंत youtube च्याद्वारे तृप्तराज पंड्या आणि इंडिया बुक रेकॉर्ड त्यांच्यानंतर गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड बीबीसी वर्ल्ड अशा विविधरीतीने गौरविला गेला. विक्रमांची नोंद झाली. त्यामुळे तृप्तराज उत्तरोत्तर तबल्यामध्ये प्रगती करू लागला आणि आज तृप्तरात 16 व्या वर्षी आहे. तो अजूनही तबला शिकत आहे, मात्र जगात सर्वात कमी वयात उत्कृष्ट तबलावादनामध्ये भारतातील तृप्तराज पांड्याची विशेष नोंद आहे.
ईटीवी भारतच्यावतीने केला प्रश्न : आई विणा पंड्या यांना ईटीवी भारतच्यावतीने प्रश्न केला गेला की, हे सगळे कसे झाले. तर त्यांनी तो किस्सा सांगितला की, एक दिवशी रात्री हा दीड वर्षाचा असताना अचानक तबलाच वाजू दे याचा आग्रह धरला. मग शेवटी मी आपले भजन गुणगुणले तीन वर्षापर्यंतचा हा बोलू शकत नव्हता. पण पंधराव्या महिन्यात याने तबलावादनाला सुरुवात केली. तो ताल आणि ठेका बरोबर धरत असल्याचे आम्हाला समजले. तर त्याच्या वडिलांनी सांगितले की, आमच्या घरात श्रीकृष्णाचे भजन गुजराती भजन आम्ही सातत्याने गात होतो. त्याच्या जन्माच्या आधीपासून आणि त्याच्या जन्मानंतर त्याच्यामुळे संगीताचे संस्कार त्याच्यावर झाले. सरस्वती पंड्या यांनी खरं सर्वात प्रथम त्याच्या तबलावादनाच्या कौशल्याकडे लक्ष दिले. त्यामुळेच आम्हाला तो साक्षात्कार झाला की याला तबला आवडतो. आज त्याने कमी वयात नावलौकिक मिळवल्यामुळे आम्हाला आनंद आहे.
घर संगीताने समृद्ध : तृप्तराज मात्र बोलायला संकोच करतो. अत्यंत शांत आणि मितभाषी असलेला कोणाशी बोलत नाही. मात्र तबल्यावर बसला की तबल्याशी बोलत आपल्याशी जणू काही बोलतात तरीही त्याला बोलते केले. त्याने सांगितले की, मला एकदा झाकीर हुसेन यांचा कार्यक्रम पाहताना खूप उचंबळून आले आणि घरात आजूबाजूला संगीताचे वातावरण असायचे आणि तबला वाजवताना मला खूप आनंद वाटतो आणि म्हणूनच मला तबलामध्ये खूप काही शिकायचे आहे. पुढे भरपूर काही त्यामध्ये करायचे आहे. तृप्तराज याचे वडील चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आई गृहिणी आहे. मात्र घर संगीताने समृद्ध आहे.