मुंबई : नितीन गडकरी यांनी आपला एक जीवनप्रसंग मुंबईतील एका कार्यक्रमात सांगितला आहे. ते सांगताना गडकरी भाविक झाले होते. अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाऊंडेशनने त्यांच्या सामाजिक कार्याअंतर्गत 'द गिफ्ट ऑफ साउंड' नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. ज्यामध्ये ते शालेय मुलांच्या श्रवण क्षमतेची चाचणी घेत आहेत. मुंबई व महाराष्ट्रातील सर्व महापालिका शाळांपासून ते देशभरातील सर्व महापालिका शाळांमध्ये हा उपक्रम नेण्याची त्यांची योजना आहे. मुंबईच्या शाळांशी घनिष्ठ संबंध निर्माण करणाऱ्या परिसर, आशा सारख्या स्वयंसेवी संस्थांसोबत, सूर्योदय फाऊंडेशनने शहरातील अनेक मुंबई महानगरपालिका संचालित शाळांमधील शेकडो शाळकरी मुलांची श्रवण तपासणी केली आहे. त्यांना मोफत श्रवण यंत्र देण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला
|
निराधारांच्या आशीर्वादाने वाचलो : आपल्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगाबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, २००४ मध्ये मी विरोधी पक्ष नेता असताना पोलीस प्रोटेक्शनमध्ये माझ्या पूर्ण कुटुंबासोबत कारने प्रवास करत होते. मी, माझी पत्नी, मुलगा, मुलगी सर्व एकत्र होतो. अचानक माझ्या गाडीला अपघात झाला. ज्यांनी ज्यांनी तो अपघात पाहिला, त्यांना असेच वाटले होते की, याच्यामध्ये कोणीच वाचले नसेल. परंतु त्या अपघातातून ते व त्यांचे संपूर्ण कुटुंब सुखरूप बाहेर आले. याचे कारण सांगताना नितीन गडकरी म्हणतात की, १९८० ला ते आमदार झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी ३० ते ३५ हजार हृदयाचे आजार असणाऱ्या लोकांचे मोफत ऑपरेशन करण्याचा उपक्रम केला आहे. त्या कारणाने जनतेचे त्यांच्यावर फार मोठे आशीर्वाद आहेत.
असंख्य लोकांना मदतीची गरज : आजही ती लोक त्यांना भेटायला येतात. त्यांच्यासोबत फोटो काढतात. त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात, परंतु ते आशीर्वाद देऊन जातात. समाजामध्ये अशा असंख्य लोकांना आजही मदतीची गरज आहे. नागपूरमध्ये सुद्धा त्यांनी ४० हजार गरजवंत लोकांना ४० कोटी रुपयांचे साहित्य वाटप केले आहे. ज्यांना पाय नाही आहे, त्यांना कृत्रिम पाय लावण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. हे कृत्रिम पाय लावल्यानंतर ते लोक आज बुलेट चालवतात, फुटबॉल खेळतात. टेक्नॉलॉजी फार बदलली आहे, त्या कारणाने लोकांचे आयुष्य बदलू शकतो. पण त्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा. ज्या लोकांना त्यांनी कृत्रिम पाय लावले आहेत. त्यांना त्यांनी आज ई रिक्षा दिली आहे. ते जीवनाच्या मुख्य प्रवाहाते पुढे चाललेले आहेत, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.