ETV Bharat / state

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये रात्री उशिरा बैठक, आज मोठ्या घोषणेची शक्यता

दोन्ही पक्षात सविस्तर चर्चा झाली आहे. उद्या शिवसेनेसोबत चर्चा होईल. त्यानंतर तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापनेबाबत माहिती देतील अशी माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार
author img

By

Published : Nov 21, 2019, 11:57 PM IST

Updated : Nov 22, 2019, 7:22 AM IST

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचे नाट्य दररोज नवीन वळणे घेत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चर्चेच्या फेऱ्या होत आहेत. सत्ता स्थापन होणार असे शिवसेनेसहीत हे दोन्ही पक्ष सांगत असले तरी याबाबत नागरिकांच्या मनात साशंकता आहे. अशात आज रात्री उशीरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. पण, उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक आहे त्या पार्श्वभूमिवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही बैठक झाली या बैठकीला शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत, तर राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार उपस्थित होते. काँग्रेसचा एकही नेता येथे उपस्थित नव्हता. बैठक संपल्यानंतर याबाबत बोलायला शिवसेनेच्या नेत्यांनी नकार दिला. पत्रकारांना हात दाखवर संजय राऊतांसह ठाकरे निघून गेले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काल दिल्लीत चर्चा झाली. यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात सत्ता स्थापन होईल याबद्दल शाश्वती देण्यात आली. दोन्ही पक्षात सविस्तर चर्चा झाली आहे. उद्या शिवसेनेसोबत चर्चा होईल. त्यानंतर तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापनेबाबत माहिती देतील अशी माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत कमी - मकरंद अनासपुरे

आतापर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येच चर्चेच्या सर्व फेऱ्या झाल्या. शिवसेनेला या चर्चेत अद्याप सामील करून घेण्यात आले नाही. उद्धव ठाकरे पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात काय चर्चा होणार याबद्दल साहजिकच कुतूहल आहे. ही चर्चा महत्वाची मानली जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील पवार या भेटीत ठाकरेंना सांगणार का, अशी शक्यताही नाकारता येत नाही.

Intro:Body:

shivsena ncp

Conclusion:
Last Updated : Nov 22, 2019, 7:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.