ETV Bharat / state

BJP Jagar Yatra Vs Uddhav Thackeray: भाजपच्या जागरला ठाकरे देणार टक्कर; लवकरच मुंबई पिंजून काढणार - BJP Jagar Yatra Vs Uddhav Thackeray

मुंबई महापालिकेतून शिवसेनेला हद्दपार (Shiv Sena expelled from BMC) करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर जागर मुंबईचा यात्रा (BJP Jagar Yatra Mumba) काढली जात आहे. शिवसेनेकडून देखील भाजपला टक्कर देण्याची रणनिती (ShivSena strategy to compete with BJP) आखली असून लवकरच मुंबई पिंजून काढली जाणार आहे.

BJP Jagar Yatra Vs Uddhav Thackeray
भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे
author img

By

Published : Nov 7, 2022, 5:19 PM IST

मुंबई : मुंबई महापालिकेतून शिवसेनेला हद्दपार (Shiv Sena expelled from BMC) करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर जागर मुंबईचा यात्रा (BJP Jagar Yatra Mumba) काढली जात आहे. शिवसेनेकडून देखील भाजपला टक्कर देण्याची रणनिती (ShivSena strategy to compete with BJP) आखली असून लवकरच मुंबई पिंजून काढली जाणार आहे.

निवडणुकीचे गणित- गेल्या निवडणुकीत मुंबई महापालिकेतील सत्तने भाजपला थोडक्यात हुलकावणी दिली. यंदा काहीही झाले तरी महापालिकेची सत्ता काबीज करायचीच, असा निर्धार भाजपने केला आहे. त्यानुसार मुंबईत पुन्हा २२७ प्रभागच कायम राहतील, या दृष्टीने नियोजन केले जात आहे. गेल्या वेळी भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी १०० ते ११५ जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. तसेच उत्तर आणि ईशान्य मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकण्याची रणनिती आहे. अशातच, तब्बल ४० आमदार फुटल्याने शिवसेनेसाठी मोठा झटका बसला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत या फुटीचा फायदा करुन घेण्यासाठी शिंदे गटासह मनसेला भाजप गोंजारत आहे. दुसरीकडे मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उपक्रम राबवण्यात आले. आता जागर मुंबईचा यात्रा सुरु केली आहे. गेली 25 सत्ता असलेल्या शिवसेनेवर यात्रेतून आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात येत आहेत. मात्र, 25 वर्षे सत्ता उपभोगताना, भाजपला गैरव्यवहार दिसला नाही का, असा सवाल ठाकरे गटाकडून विचारला जातो आहे.

शिवसेनेची रणनिती - मुंबई महापालिकेतील सत्ता अबाधित राखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. शिवसेना शाखा प्रमुख, विभागप्रमुख, संपर्क प्रमुख, समन्वयक आदींसोबत बैठकांचा धडाका सुरु आहे. भाजपच्या जागर मुंबईचा यात्रेला प्रत्युत्तर देण्याची शिवसेनेने रणनिती आखली आहे. सर्व पदाधिकारी - कार्यकर्त्यांना शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवण्यात आल्याने नवा चिन्ह आणि पक्षाचे नाव हे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्धव ठाकरे देखील लवकरच मुंबई पिंजून काढणार आहेत. दरम्यान, भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तरे देण्यात येणार आहे.

मुंबईकरच भाजपला धडा शिकवणार - आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने पदाधिकाऱ्यां​च्या​ संपर्कात आहेत. भाजप शिवसेनेसोबत सत्तेत असताना भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने फेटाळत आली. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर मात्र आरोप केले जात आहेत. भाजपने आजवर केलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत. शिवसेनेची लोकमानसातील प्रतिमा डागा​ळ​ण्यासाठी केवळ आरोपांचा भडीमार सुरु असल्याचे शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. तसेच आगामी काळात मुंबईकरच भाजपला धडा शिकवतील​ आणि मुंबई मनपावर शिवसेनेचा झेंडा फडकवतील, असेही त्या म्हणाल्या.​ ​

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विभाजन - शिवसेने पाठोपाठ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हिंदुत्वाचा नारा दिला आहे. त्यातच भाजपचे हिंदुत्व​​ आणि शिंदे गटानेही भाजपच्या हिंदुत्वाचीच री ओढली आहे. भाजपची हिंदुत्वाची मते यामुळे राज ठाकरे यांच्या पक्षाला जाऊ शकतात. असे झाल्यास भाजपला याचा फटका बसू शकतो. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे शेंडी-जाणव्याच्या हिंदुत्वाचे दाखला देत भाजपची कोंडी केली आहे. शिवसेनेच्या सर्वसमावेशक हिंदुत्वामुळे सर्व घटकांतून ठाकरेंना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मिळालेल्या विजयातून हे स्पष्ट झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या कार्ड चालणार आहे. या मुद्द्यावरुन मतांचे विभाजन होऊन भाजप, शिंदे गट, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.