ETV Bharat / state

पीक विम्याचा 15 दिवसात निकाल लावा; उद्धव ठाकरेंचे विमा कंपन्यांना अल्टीमेट्म

सत्ता कोणाची असो पीक विमा कंपनीने आतापर्यंत खूप मोठी फसवाफसवी केली आहे. ती यापुढे खपवून घेणार नाही. आम्ही ज्यांचे अन्न ज्या शेतकऱ्यांचे खातो त्या शेतकऱ्यांना आम्ही बांधील आहोत. त्यामुळे त्यांच्या पीक विम्याच्या संदर्भातील सर्व प्रक्रिया 15 दिवसात झाली पाहिजे, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

पीक विमा कंपन्यांबद्दल बोलताना उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jul 17, 2019, 5:31 PM IST

Updated : Jul 17, 2019, 5:47 PM IST

मुंबई - शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक विम्याच्या संदर्भात सर्व पिक विमा कंपन्यांनी येत्या 15 दिवसाच्या आत सर्वच प्रकारची कार्यवाही पूर्ण करावी, अन्यथा आम्हाला आक्रमक व्हावे लागेल. त्यासाठी सोळावा दिवस उजडू देऊ नका, असा सज्जड इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पीक विम्या कंपन्यांना दिला.

पीक विमा कंपन्यांबद्दल बोलताना उद्धव ठाकरे

सत्ता कोणाची असो पीक विमा कंपनीने आतापर्यंत खूप मोठी फसवाफसवी केली आहे. ती यापुढे खपवून घेणार नाही. आम्ही ज्यांचे अन्न खातो त्या शेतकऱ्यांना आम्ही बांधील आहोत. त्यामुळे त्यांच्या पीक विम्याच्या संदर्भातील सर्व प्रक्रिया 15 दिवसात झाली पाहिजे, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असलेल्या भारती अक्सा या पीक विमा कंपनीच्या मुख्य कार्यालयावर शिवसेनेकडून आज ईशारा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये शिवसेनेचे खासदार, आमदार यांच्यासह राज्यातले अनेक मंत्री सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य यांनी केले. राज्यभरातून या मोर्चाला शेतकरी आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईतील पीक विमा कंपनीची कार्यालये येथे आहेत. ती पाहून ठेवा आपल्याला येथे काही दिवसांनी धडकावे लागणार असल्याचे त्यांना मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना सांगितले.

शिवसेना किंवा युतीला मते दिली असेल नसेल त्या प्रत्येक मताला मी बांधील आहे. त्यासाठीच आम्ही त्या सर्वांचे आशिर्वाद घेण्यासाठी गुरुवारपासून जनआशिर्वाद यात्रा काढत असल्याचे उद्धव यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँकांना इशारा -

राज्यात देण्यात आलेल्या शेतकरी कर्जाच्या संदर्भातही अनेक बँका फसवणूक करत आहेत. त्यामुळे बँकांनी किती शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली? त्याची यादीही आपल्या बँकांसमोर लावावी. अन्यथा शिवसेना सोळाव्या दिवशी आपले उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी बँकांना दिला. मोर्चाची सांगता भारती अक्सा विमा कंपनीचा कार्यालया शेजारी झाली. यावेळी ते समारोपीय भाषणात बोलत होते.

आमच्या मोर्चाबद्दल टीका करणाऱ्या एका पक्षाला अध्यक्ष नाही; उद्धव यांची काँग्रेसवर टीका

आम्ही मातीशी इमान राहणार आहोत. त्यामुळे मुंबईत हा मोर्चा काढला. आमच्यावर टीका करणाऱ्या एका पक्षाला सध्या अध्यक्ष देखील नाही. त्यामुळे अध्यक्ष पाहीजे म्हणून ते जाहीरात करतात. मात्र, आता त्यांना अध्यक्ष सापडला नाहीतर थोड्याच दिवसांनी यांच्या पक्षाला शोधावे लागेल, अशी खोचक टीका ठाकरे यांनी काँग्रेसवर केली. तसेच आम्ही काय करायचे आम्हाला सांगू नका. आम्ही शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे उद्धव म्हणाले.

Intro:आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका; उध्दव ठाकरे यांचा पीक विमा कंपन्यांना इशाराBody:आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका; उध्दव ठाकरे यांचा पीक विमा कंपन्यांना इशारा

मुंबई, ता. १७ :

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक विम्याच्या संदर्भात सर्व पिक विमा कंपन्यांनी येत्या 15 दिवसाच्या आत सर्वच प्रकारची कार्यवाही पूर्ण करावी अन्यथा आम्हाला आक्रमक व्हावे लागेल त्यासाठी सोळावा दिवस उजडू देऊ नका असा सज्जड इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
सत्ता कोणाची असो पीक विमा कंपनीने आतापर्यंत खूप मोठी फसवाफसवी केलेल्या ती यापुढे खपवून घेणार नाही. आम्ही ज्यांचे अन्न खातो त्या शेतकऱ्यांना आम्ही बांधील आहोत. त्यामुळे त्यांच्या पीक विम्याच्या संदर्भातील सर्व प्रक्रिया पंधरा दिवसात झाली पाहिजे असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असलेल्या भारती अक्सा या पीक विमा कंपनीच्या मुख्य कार्यालयावर शिवसेनेकडून आज ईशारा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शिवसेनेचे खासदार, आमदार यांच्यासह राज्यातले अनेक मंत्री सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य यांनी केले राज्यभरातून या मोर्चाला शेतकरी आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोर्चाची सांगता भारती अक्सा विमा कंपनीचा कार्यालया शेजारी झाली. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या समारोपाच्या भाषणात राज्यात देण्यात आलेल्या शेतकरी कर्जाच्या संदर्भातही अनेक बँका फसवणूक करत आहेत, त्यामुळे त्यांनीही किती शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्याची यादीही आपल्या बँकांसमोर लावावी अन्यथा शिवसेना सोळाव्या दिवशी आपले उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला.
ठाकरे आणि या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना आवाहन करत मुंबईतील पीक विमा कंपनीची ही कार्यालये इथे आहेत ती पाहून ठेवा आपल्याला इथे काही दिवसांनी धडकावे लागणार असल्याचे सांगितले.

ज्यांनी शिवसेना किंवा युतीला मते दिली असतील, नसतील त्या प्रत्येक मताला मी बांधील आहे. त्यासाठीच आम्ही त्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्यापासून जन आशीर्वाद यात्रा काढत आहोत असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील मोर्चावर करण्यात येत असलेल्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की आम्ही मातीशी इमान राहणार आहोत म्हणूनच आणि मुंबईत हा मोर्चा काढतो. आमच्यावर जे टीका करत आहेत त्यातील एका पक्षाला तर सध्या अध्यक्ष सुद्धा नाहीये म्हणून ते अध्यक्ष पाहिजे म्हणून जाहिरात करतात. मात्र आता जर या लोकांना अध्यक्ष सापडला नाही तर थोड्या दिवसांनी यांच्या पक्षाला शोधावे लागेल अशी स्थिती यांची बनली असल्याची खोचक टीका ही ठाकरे यांनी केली. तसेच आम्ही काय करायचे आम्हाला सांगू नका आम्ही शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत असे ते म्हणाले.
पीक विमा कंपनीने आतापर्यंत शेतकऱ्यांची फसवणूक केलेले आहे त्यामुळे आता त्यांना हा आमचा शेवटचा इशारा हे 15 दिवसाची आम्ही मदत होत असून सोळाव्या दिवशी आज झालेला जो मोर्चा आहे तो मोर्चा बोलेल असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला.

Conclusion:
Last Updated : Jul 17, 2019, 5:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.