ETV Bharat / state

Uddhav Thackeray Reply : फडणवीसांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, तर राज ठाकरेंना लगावला टोला - उद्धव ठाकरे बातमी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानसभेतील भेट दिवसभर चर्चेचा विषय होती. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेले माहीम दर्गा प्रकरणही गाजत आहे. या दोन्ही विषयांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषेत उत्तर दिले आहे.

file photo
फाईल फोटो
author img

By

Published : Mar 23, 2023, 10:35 PM IST

मुंबई - 2019 च्या विधानसभा निवडुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे राजकारणात उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा संघर्ष पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे आज एकत्र विधानभवनात दाखल झाले होते. दोघांची एकत्र एन्ट्री झाल्याने हा सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला. याप्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांना त्यांनी मशीद विषयावरून टोला लगावला तर फडणवीस यांच्या भेटीवर त्यांनी बंद दाराआडच्या चर्चांचा विषय बाहेर काढला आहे.

  • Maharashtra | Not every meeting takes place with intentions. The interaction between me & Devendra Fadnavis was merely an exchange of greetings and nothing much while entering the assembly: Former Maharashtra CM Uddhav Thackeray https://t.co/GczkDA4fd8 pic.twitter.com/SdhWSpMvfz

    — ANI (@ANI) March 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बंद दाराआड होणाऱ्या चर्चा अधिक फलदायी - आमची प्रत्येक बैठक हेतूने होत नाही. विधानसभेत प्रवेश करताना माझा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवाद हा केवळ शुभेच्छांची देवाणघेवाण होता. त्यामुळे त्या भेटीकडे फार काही लक्ष देऊ नका, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. पूर्वी राजकीय वातावरण अधिक मोकळे होते, आजकाल बंद दाराआड होणाऱ्या चर्चा अधिक फलदायी ठरतात, असे म्हणतात. त्यामुळे आमची कधी बंद दाराआड बैठक झाली तर आम्ही तुम्हाला नक्की कळवू, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

काय घडले विधिमंडळात - विधानभवनात उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. यावेळी दोघांनी एकमेकांशी गप्पा मारल्या व चर्चा केल्याचे व्हिडिओ दिसून येत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य देखील यात दिसून येत आहे. त्यामुळे या भेटीची चर्चा पूर्ण अधिवेशनात पाहायला मिळाली.

राज ठाकरेंची स्क्रिप्ट वरून आली - राज ठाकरे यांच्या भाषणावर उद्धव ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे गेली अनेक वर्षे तेच बोलत असल्याने मी त्यांचे भाषण ऐकले नाही. बेकायदेशीर जागेत बांधलेली दर्गा ही काही नवीन गोष्ट नाही, याआधीही निवडून आल्यानंतर वेगवेगळे नेते आले होते, त्यानंतर कारवाई झाली नाही, पण ही स्क्रिप्ट वरून आली असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.