ETV Bharat / state

आज उद्धव ठाकरेंची मुंबईत पहिली सभा

मुंबईत उद्धव ठाकरेंच्या दोन सभा होणार असून एक आज दक्षिण मुंबईत व दुसरी उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी १६ तारखेला होईल

संग्रहीत फोटो
author img

By

Published : Apr 9, 2019, 12:52 PM IST

मुंबई - निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईत पहिली सभा घेणार आहेत. दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ आज संध्याकाळी ६ वाजता महालक्ष्मी रेसकोर्स येथे उध्दव ठाकरेंची पहिली सभा होईल.

राज्य पिंजून काढण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेण्याची व्यूहरचना शिवसेनेने आखली आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या दोन सभा होणार असून एक आज दक्षिण मुंबईत व दुसरी उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी १६ तारखेला होईल. मात्र, उद्धव ठाकरेंच्या सभा या केवळ शिवसेनेच्याच उमेदवारांसाठी होणार आहेत.

एकीकडे उच्चभ्रू वर्ग, दुसरीकडे मोठ्या संख्येने असलेला मराठी वर्ग व त्यानंतर गुजराती भाषिक हे दक्षिण मुंबईत पाहायला मिळतात. या मतदारसंघात आघाडीकडून काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या परिसरात सुरू असलेले मेट्रोचे काम त्यामुळे होणारी वाहतूककोंडी व या प्रकल्पात बाधित नागरिकांना करावे लागणारे स्थलांतर या प्रश्नांनी डोके वर काढले आहे. यामुळे काही प्रमाणात नागरिकांमध्ये नाराजी असलेल्या या भागात सेनेला पुन्हा सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरेंना सभा घ्यावी लागत आहे.

Intro:निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईत पहिली सभा घेणार आहेत. दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यासाठी आज संध्याकाळी 6 वाजता महालक्ष्मी रेसकोर्स येथे उध्दव ठाकरेंची पहिली सभा होईल. Body:राज्य पिंजून काढण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेण्याची व्यूहरचना शिवसेनेने आखली आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या दोन सभा होणार असून एक आज दक्षिण मुंबई व दुसरी उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी 16 तारखेला होईल. मात्र उद्धव ठाकरेंच्या सभा या केवळ शिवसेनेच्याच उमेदवारांसाठी होणार आहेत.
एकीकडे उच्चभ्रू वर्ग दुसरीकडे मोठया संख्येने असलेला मराठी वर्ग व त्यानंतर गुजराती भाषिक दक्षिण मुंबईत पाहायला मिळतात. या मतदारसंघात आघाडीकडून काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या परिसरात सुरू असलेले मेट्रोची काम त्यामुळे होणारी वाहतूककोंडी व या प्रकल्पात बाधित नागरिकांना करावा लागणारी स्थलांतर या प्रश्नांनी डोके वर काढले आहे. यामुळे काही प्रमाणात नागरिकांमध्ये नाराजी असलेल्या या भागात सेनेला पुन्हा सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरेंना सभा घ्यावी लागतेय. Conclusion:आज होणाऱ्या मुंबईतील पहिल्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.