ETV Bharat / state

Uddhav Thackeray : 'मी फक्त जाणीव करून दिली, शिव्या दिल्या नाही', फडणवीसांवरील वक्तव्यावर उध्दव ठाकरेंचा खुलासा - देवेंद्र फडणवीस नागपूरचे कलंक

सोमवारी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. 'मी त्यांना फक्त जाणीव करून दिली, शिव्या दिल्या नाही', असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jul 11, 2023, 3:26 PM IST

मुंबई : अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर आघाडी सरकारचे नेते आणि विरोधी पक्षांमध्ये शाब्दिक लढाई सुरू आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आता गदारोळ सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नागपुरात त्यांचे पुतळे देखील जाळण्यात आले. या सर्व परिस्थितीवर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

'लोकांच्या मनात राग आहे' : पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी दोन दिवसांचा विदर्भाचा छोटेखानी दौरा केला. या दौऱ्यात विदर्भातील अनेक कार्यकर्त्याना भेटलो. अमरावती, नागपूरमध्ये माझे मेळावे झाले. नागपूर, दिग्रस आणि अमरावती दौऱ्यात लोक माझ्या स्वागतासाठी थांबले होते. या दौऱ्यात मला एक कळलं की लोकांच्या मनात राग आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खालावला आहे. सध्या राज्यात जे काही सुरू आहे ते लोकांना आवडलेलं नाही', असे ते म्हणाले.

'होऊ द्या चर्चा' उपक्रमाची सुरुवात : उध्दव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, 'लोकं मला सांगत होते की काळजी करू नका. आम्ही निवडणुकीची वाट पाहात आहोत. सध्या पावसाळा सुरू असल्याने माझे दौरे थांबले आहेत. मी लवकरच महाराष्ट्रात फिरणार आहे. पावसाळ्यात सभा न घेता पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचतात का? याची माहिती घ्यायला हवी. मी कार्यकर्त्यांना याबद्दल सांगितलं आहे. या नव्या उपक्रमाला मी 'होऊ द्या चर्चा' असं नाव दिलं आहे'.

'आता मुश्रीफांच्या मांडीला मांडी लावून बसले' : देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी जे काही बोललो त्यात एवढं लागण्यासारखं काय आहे? ज्यांना लागलं त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले, तो कलंक नाही का? हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने रस्त्यावर येऊन आक्रोश केला होता. त्यांनी आम्हाला गोळ्या घाला, असं म्हटलं होतं. आता त्यांनी हसन मुश्रीफ यांना सोबत घेतलं आहे. आता तेच मुश्रीफ यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. यांना मांडी नावाचा अवयव आहे हे आता कळलं, असा टोला ठाकरेंनी लगावला.

'70 हजार कोटीचं काय झालं?' : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना 'गडकरींना देखील यातून जावं लागलं आहे. आम्ही फक्त आठवण करून दिली', असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता लोकमान्य टिळक पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे. तो शरद पवार यांच्या हस्ते दिला जाणार आहे. मग आता 70 हजार कोटीचं काय झालं?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. माझं जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा ते माझ्या तब्येतीवर बोलले. माझ्या ऑपरेशनवर खिल्ली उडवली. मानेचा पट्टा गेला, कंबरेचा पट्टा गेला असं म्हणत होते. मी खरी परिस्थिती काय आहे तेवढं दाखवलं. शिव्या वगैरे दिल्या नाही. राज्याचं राजकारण हे आयपीएल सारखं झालं आहे. कोणता खेळाडू कोणासोबत आहे कळत नाहीये, असे ते म्हणाले.

'वाघेलांना युतीधर्मामुळे पक्षात घेतले नाही' : नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक व गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्या भेटीबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी एक जुनी आठवण सांगितली. उद्धव ठाकरे म्हणाले की, 'वाघेला यांचे भाजपमध्ये वाद झाले. त्यानंतर त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माध्यमांनी बातम्या चालवल्या होत्या की वाघेला मुंबईत बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत. या सर्व चर्चा सुरू असताना अचानक प्रमोद महाजन मातोश्रीवर आले. ते बाळासाहेबांना भेटले. तेव्हा प्रमोद महाजन यांनी बाळासाहेबांना वाघेला येत असतील तर त्यांना पक्षात घेऊ नका असे सांगितले होते. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं की, तुम्ही काळजी करू नका. आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही. अशाप्रकारे त्यांनी युतीचा धर्म पाळला होता'.

हेही वाचा :

  1. Uddhav Thackeray : 'देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे कलंक', उद्धव ठाकरेंची जहरी टीका
  2. Uddhav Thackeray : 'राम मंदिर भाजपमुळे बनले नाही, तर..' उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.