मुंबई: शिवसेनेतील फुटीनंतर बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कट्टर शिवसैनिक मनोहर जोशी यांना वळवण्याचे अनेक प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनीही वारंवार जोशी यांची भेट घेतली. त्यामुळे जोशी शिंदे गटात जाणार अशा वावड्या उठल्या.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या: मात्र, माझं रक्त शिवसेनेचा असून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभा असल्याचे स्पष्टीकरण मनोहर जोशी यांनी दिले आहे. त्यानंतर ठाकरे यांनी दिलजमाई करत, जोशींची सपत्नीक घरी जाऊन भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजकीय वर्तुळात त्यामुळे आता जोरदार चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गट आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
जोरदार चर्चा रंगल्या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची भेट घेतली. शिंदे गटाच्या नेत्यांकडून सतत जोशींच्या संपर्कात होते. जोशी हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा यावेळी रंगली होती. जोशींच्या भूमिकेकडे यामुळे सर्वांचे लक्ष लागले होते. आज वाढदिवसाच्या दिवशी मनोहर जोशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जोशी यांची भूमिका स्पष्ट: माझे रक्त हे शिवसेनेचे आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास, उद्धवजींचा सहवास, मी महाराष्ट्र, शिवसेनेसाठी आहे. बाळासाहेबांच्या अपेक्षा मी पूर्ण करु शकलो याचे समाधान असल्याचे मनोहर जोशी यांनी म्हटले. जोशी यांची भूमिका स्पष्ट होताच उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह मनोहर जोशी यांच्या घरी जाऊन भेट घेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत नेहमी खंबीरमपणे उभे राहलेले जोशी हे आजही ठाकरे कुटुंबाच्या सोबत आहेत. त्यामुळे शिंदे गटात जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.