ETV Bharat / state

Uddhav Thackeray Jammu Kashmir Visit : काश्मिरी पंडितांशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे जम्मू कश्मीरला जाण्याची शक्यता - उद्धव ठाकरेंची काश्मिरी पंडितांशी चर्चा

काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीवर उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. जमल्यास ते काश्मिरी पंडितांची काश्मीर मध्ये जाऊन भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना काश्मीरमध्ये जाण्यास जमले नाही तर आदित्य ठाकरे हे नक्कीच काश्मिरी पंडितांची भूमिका जाणून घेण्यासाठी काश्मीरला जातील अशी शक्यता खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. सायन येथे शिवसेना नेत्यांचा मेळावा पार पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Uddhav Thackeray Jammu Kashmir Visit
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jan 23, 2023, 10:38 PM IST

संजय राऊत यांनी पत्रकारांनी दिली मुलाखत

मुंबई : केंद्र सरकार काश्मीरच्या मुद्द्यावर पूर्णपणे निष्फळ ठरले आहे. नुकताच आपण भारत जोडो यात्रेत सहभाग घेण्यासाठी काश्मीरमध्ये गेले होतो. तिथे काश्मीरमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून काश्मिरी पंडितांचे आंदोलन सुरू आहे. हजारो काश्मीर पंडितांची कुटुंब रस्त्यावर आंदोलन करत आहेत. आपण ज्यावेळेस तिथे पोहोचलो त्यावेळेस त्या काश्मिरी पंडितांनी "बाळासाहेब ठाकरे अमर रहे" अशा घोषणा दिल्या. आंदोलन करणारे हे सरकारी कर्मचारी आहेत. काश्मिरी खोऱ्यात गेल्यानंतर त्यांचे टार्गेट किलिंग केले जात आहे. आंदोलन करणाऱ्या काश्मिरी पंडितांची केवळ एवढीच मागणी आहे की, आम्ही जम्मूत राहतो म्हणून आमचे ट्रान्सफर जम्मूत करण्यात यावेत. मात्र त्यांची एवढी साधी मागणीदेखील केंद्र सरकार पूर्ण करत नाही. उलट गेल्या सहा महिन्यांपासून या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार बंद करण्यात आलेले आहेत. जे सरकारी निवासस्थान होती ती, रिकामी करण्यात आली आहेत. मग कश्मीरी पंडितांबाबत केंद्र सरकारची ही भूमिका असेल तर त्यांनी हिंदुत्वाचे नारे देऊ नयेत. ही सर्व परिस्थिती आपण मुंबईत आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही सांगितले.

संजय राऊत यांचे जोरदार भाषण : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना नेत्यांचा मेळावा आज सायन येथील षमुखानंद हॉल येथे पार पडला. यावेळी संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटावर टीकेची जोड उठवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई द्वारा असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात आपण जाऊ चला इकॉनोमिक फोरमच्या समिटला गेल्यानंतर आपल्याला काही विदेशातले राष्ट्राध्यक्ष भेटले. त्यांनी देखील आपण मोदी भक्त आहोत असे म्हटले होते. या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आज आपल्याला शिवसेना मेळाव्याच्या बाहेर चार गोरे लोक दिसली तेही वेगवेगळ्या देशातली होती. ते आपल्याला म्हणाले की, आपण आज उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकायला आलो आहोत, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

शिवसेना अभेद्य आहे : शिवसेना काय आहे, हा शिवसेनेचा इतिहास नेहमी सांगतो. निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालय कागदावरची शिवसेना सांगू शकतील. मात्र शिवसेनेचा इतिहास कोणालाही मिटवता येणार नाही. शिवसेनेचा इतिहास काय आहे हे मिंदे गटाला अनुभवायचा असेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडाव्यात, असा टोला ठाकरे गटाला राहू त्यांनी लगावला. शिवसेना मिटवण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, शिवसेना कोणालाही मिटवता येणार नाही. हल्ली देवाच्या मुर्त्या चोरण्याचे काम झाले आहे. मात्र जे देवाची मूर्ती तोडतात ते त्या मूर्तीचे दुसरे देऊन बांधत नाही तर त्या मूर्तीची विक्री करतात असा टोला आपल्या भाषणातून शिंदे गटाला संजय राऊत यांनी लगावला.

चाळीस दगड गाळात जाणार : आपल्या भाषणातून शिंदे गटावर संजय राऊत यांनी चांगलेच केले लगावले. आम्ही सर्व दगड होतो या दगडाला शेंदूर लावण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले आणि जो दगड बाळासाहेबांच्या हातातून निसटला तो पाण्यात बुडाला. त्याच पद्धतीने बंडखोर 40 आमदार पाण्यात बुडून त्यांचा गाळ झाल्याशिवाय राहणार नाही असेही राऊत यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Encounter Specialist Pradeep Sharma Bail : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; जामीन अर्ज फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.