ETV Bharat / state

'मातोश्री' ते 'वर्षा' ; ठाकरेंचा किंगमेकर ते किंगपर्यंतचा प्रवास

३० वर्षांपासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती. मधल्या काळात ही युती तुटून पुन्हा जुळली. गेल्या पाच वर्षात शिवसेना भाजपमागे फरफटत जाताना दिसली. पण, २०१९च्या निवडणुक निकालानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आणि आता उद्धव ठाकरे राज्याच्या सत्ता सिंहासनावर आरुढ होत आहेत.

mumbai
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Nov 26, 2019, 11:51 PM IST

मुंबई - मी सत्तेच्या सिंहासनावर बसणार नाही अशी प्रतिज्ञा बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. पण, त्यांचेच पुत्र उद्धव महाराष्ट्राच्या सत्तेवर आरुढ होण्यास निघाले आहेत. नव्याने गठीत झालेल्या महाविकास आघाडीने त्यांना मुख्यमंत्रपदाचा उमेदवार घोषीत केले आहे. दहा वर्षांपूर्वी उद्धव यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. आज तेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत.

उद्धव बाळ ठाकरे
जन्म - २७ जुलै १९६०
शिक्षण - सर जे. जे. आर्ट्स स्कूल

फोटोग्राफर उद्धव ठाकरे
बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार म्हणून साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. राजकारणात येण्याआधी एक गुणवान व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी नाव कमावले होते. उद्धव यांच्याकडे ही व्यंगचित्रकलेची कला तर आली नाही. पण, फोटोग्राफीचा त्यांना छंद आहे. ते उत्तम फोटोग्राफी करतात. महाराष्ट्र देश आणि पाहावा विठ्ठल ही फोटोग्राफीवरील त्यांची दोन पुस्तके प्रकाशीत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या जिद्दीची कहाणी
उद्धव ठाकरे यांच्या चिकाटी आणि जिद्दीविषयी एक किस्सा सांगितला जातो. राज ठाकरे हे बॅडमिंटन खेळण्यात मोठे वाकबगार होते. एकदा त्यांनी आणि काही मित्रांनी उद्धवना खेळण्यासाठी बोलावले. उद्धवना बॅडमिंटन खेळण्यात स्वारस्य नव्हते. पण , ते आले. खेळता खेळता उद्धव पडले. तेव्हा सर्व मित्र त्यांना हसले. त्यानंतर उद्धव कधी खेळायला आले नाहीत.
सर्वांना वाटले की उद्धवना त्यांचा अपमान झाला असे वाटले असेल म्हणून ते आले नसावेत. पण, प्रकार काही वेगळाच होता. ज्या प्रशिक्षकाकडून राज प्रशिक्षण घेत असत त्यांच्याचकडून उद्धवनी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि काही दिवसातच त्यांनी बॅडमिंटन खेळण्यात प्राविण्या मिळवले.

उद्धव ठाकरेंचा राजकारण प्रवेश
गोष्ट आहे १९९१ सालची. विदर्भात एके ठिकाणी एक बेरोजगारांचे एक आंदोलन होते. ज्याचे नेतृत्व विद्यार्थी सेनेचे प्रमुख राज ठाकरे करणार होते. पण, ऐनवेळी त्यांना सांगण्यात आले की उद्धव ठाकरे देखील तिथे भाषण करतील. राज या प्रकारामुळे बरेच चिडले होते असे सांगण्यात येते. पण, हा उद्धव यांचा राजकारणातील चंचुप्रवेश होता.

महाबळेश्वर येथील अधिवेशन
२००३ ला महाबळेश्वर येथे शिवसेनेचे अधिवेशन होते. हे अधिवेशन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारे ठरले. त्या आधी उद्धव पक्षात बऱ्यापैकी सक्रिय झाले होते. या अधिवेशनात त्यांना कार्यध्यक्षपदी नेमण्यात यावे असा ठराव राज ठाकरेंनी मांडला आणि तो सर्वानुमते संमत करण्यात आला. इथूनच उद्धव यांचे शिवसेनेतील स्थान प्रबळ झाले.

२००९ चे मनसेचे आव्हान
शिवसेनेतील सत्तासंघर्षात उद्धव यांनी बाजी मारली. नाराज होऊन राज ठाकरेंनी मनसेची निर्मिती केली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपुढे मनसेचे आव्हान होते. शिवसेनेच्या अस्तित्वापुढेच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. पण, तरीही या आव्हानापासून रक्षण करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले. फारशी हानी न होऊ देता त्यांनी शिवसेना शाबूत ठेवली.

२०१४ नंतरची शिवसेना
मोदींच्या प्रचंड लाटेमध्ये शिवसेनेने आपला गड राखला. पण, राज्य सरकारमध्ये तिला मानहानी स्वीकारावी लागली. पाच वर्षे सत्तेत असूनही शिवसेना विरोधाच्या भूमिकेतच राहिली. पण, २०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी भाजपला खिंडीत गाठत सत्तेचे शिखर गाठण्याचा प्रयत्न केला. आणि आता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर ते सिंहासनावर विराजमान होत आहे.

Intro:Body:

उद्धव ठाकरे  यांचा अल्प परिचय

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तृतीय पुत्र . २७ जुलै १९६० साली उद्धव ठाकरे यांचा जन्म .

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या  हक्कांसाठी काढलेल्या शिवसेना या पक्षाला ५० वर्ष झाली आहेत . उद्धव ठाकरे  आपल्या तरुण वयात वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत पक्षाच्या कामकाजात लक्ष घालत होते . मात्र २००३ साली  खऱ्या अर्थाने ते सक्रिय झाले . पक्षाच्या महाबळेश्वर  इथल्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची  शिवसेनेचे कार्याध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली .

उद्धव यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांनी पक्षाच्या  राजकारणात शिवसेनाप्रमुखांच्या सोबतअधिक काळ घालवला होता . अनेक दौऱ्यात राज शिवसेनाप्रमुखांच्या सोबत होते . शिवसेना प्रणित  विद्यार्थी सेनेचे राज ठाकरे हे अध्यक्ष ही  होते . याच राज ठाकरे यांनी महाबळेश्वराच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना पक्षाचे कार्याध्यक्ष पदी निवड व्हावी असा ठराव मांडला होता . त्यानंतर राज ठाकरे यांची महत्वकांक्षा  लपून राहिली नाही . सुप्त स्वरूपात या दोन्ही भावात मतभेद  वाढत चालले होते . तसेच याच दरम्यान सेनेचे जेष्ठ नेते नारायण राणे यांनीही २००५ साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केला . त्याकाळात मोठ्या प्रमाणात उद्धव यांना विरोध सहन करावा लागला . राणे यांनी उद्धव ठाकरे यांना वारंवार लक्ष केले होते . त्या राजकीय स्तिथीचा ही  उद्धव ठाकरे यांनी सामना केला . त्यानंतर एकाच वर्षात  २००६ साली राज ठाकरे यांनीही शिवसेनेला  रामराम ठोकत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष काढला . उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत   पक्षात मोठी पडझड झाली होती . त्यावेळी शिवसेना संपण्याच्या वाटेवर असल्याची टीकाही उद्धव यांच्यावर करण्यात आली . मात्र २००७च्या  मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा सत्ता  कायम राखली , ही उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीची जमेची बाजू मानली  जाते .

महाराष्ट्रात २००९ साली विधानसभेच्या निवडणूका  झाल्या यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  पक्षाच्या धोरणात सक्रिय नव्हते . या निवडणुकीत राज ठाकरे  यांचे आव्हान असताना उद्धव यांनी मोठ्या हिमतीने निवडणूक लढवली . या निवडणुकीत पक्षाला मोठे यश लाभले नाही . मात्र पक्षाची मोठी हानी झाली असताना ही उद्धव ठाकरे यांनी आपल्या संयमी नेतृत्वाची झलक दाखवली .

२०१४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत केवळ लोकसभा निवडणूक लढवली . मात्र विधानसभेची निवडणूक त्यांनी स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला होता . स्वबळावर निवडणूक लढवून त्यांनी ६३ आमदार निवडणून आणले . सुरुवातीला त्यांनी सत्तेत जाण्यापेक्षा विरोधात जाणे पसंत केले , मात्र नंतर वाटाघाटी नंतर शिवसेना पंधरा वर्ष नंतर भाजपच्या नेतृत्वात सत्तेत सहभागी झाली. भाजप शिवसेनेच्या महायुतीत शिवसेना नेहमीच मोठा पक्ष राहिला . मात्र २०१४ साली चित्र बदलेले दिसले . भाजप शिवसेनेला शिरजोर ठरत होती . राज्यात आणि केंद्रात भाजप सोबत शिवसेना सत्तेत असली तरी सेनेने विरोधी पक्षाचेच भूमिका बजावली , देशाच्या राजकारणात हा नवा पायंडा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेने पाडला .

२०१९च्या लोकसभेत शिवसेना भाजप सोबत युती करायला तयार नव्हती मात्र , भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी सत्तेत सामान वाटा  देण्याच्या मुद्दयावर युती केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले . याच आधारावर विधानसभेत ही युती करण्यात आली आली . मात्र या दोन्ही पक्षात मुख्यमंत्री पदाच्या वाटाघाटी साठी बेबनाव  निर्माण झाला . परिणामी आपलाही खडखड बाहेर काढत उद्धव ठाकरे यांनी पारंपरिक  विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत घरोबा निर्माण करण्याचा निर्णय घेऊन भाजपाला धडा शिकवण्याचा प्रयत्न चालवला आहे . नव्या सत्ता समीकरणात उद्धव ठाकरे यांनीच राज्याचे नेतृत स्वीकारून मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे .

उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीची आवड आहे . आपल्या आवडीला त्यांनी मूर्त रूप देत महाराष्ट्र देशा  आणि पाहावा विठ्ठल ही  दोन छायाचित्रणावर आधारित पुस्तकाचे लिहून ही केले .

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.