ETV Bharat / state

Prasad Lad on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर प्रसाद लाड यांची जहरी टीका; Watch Video - उद्धव ठाकरे खरा औरंग्या

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका भाजपला चांगलीच झोंबली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे यांच्यावर जहरी टीका करत त्यांनी लायकी ठेवून बोलावं, असे विधान केले आहे.

Prasad Lad Criticism Uddhav Thackeray
प्रसाद लाड
author img

By

Published : Aug 7, 2023, 6:30 PM IST

Updated : Aug 7, 2023, 6:41 PM IST

प्रसाद लाड उद्धव ठाकरेंवर टीका करताना

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी रंग शारदा येथे केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांचा मस्टर मंत्री म्हणून उल्लेख केला. तर भाजपची वृत्ती औरंग्याची आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानाचा भाजपनेही खरपूस समाचार घेतला आहे. या संदर्भात बोलताना भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे.

देवेंद्र मास्टर मंत्री : देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांच्यासोबत असलेले अनेक मंत्री आणि आमदार त्यांना सोडून गेले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच खरे मस्टर मंत्री राहिले असते, असे उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले होते. याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करू नये, देवेंद्र हे मस्टर मंत्री नाही तर मास्टर मंत्री आहेत, असे प्रसाद लाड म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांनी आधी आपण काय बोलतो, याचे भान ठेवावे. 'उद्धव ठाकरे हेच खरे औरंग्या आहेत. त्यांनी सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणे पसंत केले आणि भाजपसारख्या मित्राला धोका दिला. त्यामुळे खरा औरंग्या हे उद्धव ठाकरेच आहेत. यामुळे त्यांनी आपली लायकी ठेवून बोलावे', असेही प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

ठाकरेंना पक्ष टिकवता आला नाही : या प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून बावनकुळे यांनी म्हटले आहे की, ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही त्या उद्धव ठाकरेंनी भाजपमध्ये राम उरला नाही असे म्हणण्यात अर्थ नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू रामचंद्राची तुम्हाला आठवण येत असल्याचा टोला बावनकुळेंनी लगावला आहे. राम मंदिराचे भूमिपूजन झाले तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारने राज्यभरात गुन्हे दाखल केले होते हे कसे विसरला, असा सवाल बावनकुळेंनी केला आहे. तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. ती प्रामाणिक शिवसैनिकांनी मुक्त केली आहे आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा डौलानं महाराष्ट्रात फडकत असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.

मोदींवर टीका करण्याची ठाकरेंची लायकी नाही : पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मास्टर चौकारामुळे तुम्हाला घरी बसावे लागले आहे. औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलाय ते महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेच आहे. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला, तसाच सुरुंग जनतेने तुमच्या सत्तेलाही लावला, असेही बावनकुळे म्हणाले आहेत.

हेही वाचा:

  1. Rajani Patil News: काँग्रेससाठी दुसरी दिलासादायक बातमी! रजनी पाटील यांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर
  2. Modi Criticized Congress : पंचायत राज संस्था मजबूत करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले नाहीत - पंतप्रधान मोदी
  3. Nana Patole News : कुठला आमदार कुठल्या गटात हे विधानसभा अध्यक्षही छातीठोकपणे सांगू शकणार नाहीत, राष्ट्रवादीवरुन नाना पटोलेंचा टोला

Last Updated : Aug 7, 2023, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.