ETV Bharat / state

Rahul Gandhi Savarkar Row : सावरकरांबद्दलच्या राहुल गांधींच्या विधानाचा ठाकरे गटाकडून निषेध; काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीला हजर राहणार नाही - उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना आज रात्री त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. या बैठकीला ठाकरे गट उपस्थित राहणार नसल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाला आमचा विरोध असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Mar 27, 2023, 4:50 PM IST

मुंबई - दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना सावरकरांचा उल्लेख केला होता. माफी मागायला मी सावरकर नाही, मी गांधी आहे असे आशयाचे विधान राहुल गांधी नवी दिल्लीत केले होते. या विधानाला ठाकरे गटाचा विरोध आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनीदेखील राहुल गांधी यांना इशारा दिला होता. ठाकरे गट हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा एक मुख्य भाग आहे. त्यामुळे आता सा्वरकरांच्या विषयावरून महाराष्ट्रातील काँग्रेस आणि् ठाकरे गटांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. राहुल गांधी हे काँग्रेसचे विचार मांडत आहे, असे म्हणत नाना पटोले यांनीही उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

  • Uddhav Thackeray faction decides not to attend the meeting at Mallikarjun Kharge's residence today because Rahul Gandhi said that I am not Savarkar, I am Gandhi: Sanjay Raut to ANI pic.twitter.com/rJN0wqR8gl

    — ANI (@ANI) March 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले होते राहुल गांधी - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. मानहानीच्या विषयावरून तुम्ही माफी मागणार का, असा प्रश्न यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, माफी मागायला मी सावरकर नाही, मी गांधी आहे. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचे यावेळी राहुल गांधी म्हणाले होते.

उद्धव ठाकरे यांचा गांधींना इशारा - राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. या वादग्र्स्त विधानावरुन शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना सभेतून इशारा दिला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहेत. आम्ही आमच्या दैवतांचा अपमान कधीही सहन करणार नाहीत. त्यांनी तब्बल 14 वर्ष छळ सोसला होता. त्यामुळे त्यांचा अपमान आम्ही सहन करण्रा नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. रविवारी मालेगाव येथे सभा झाली होती त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला होता.

काँग्रेसच्या बैठकीला जाणार नाही - उद्धव ठाकरे गटाने आज मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचा आम्ही विरोध करत असून, त्यामुळेच आजच्या विरोधी सर्वपक्षीय बैठकीला आम्ही जाणार नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी एएनआयशी बोलताना स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray Malegaon : सावरकर आमचे दैवत, उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सुनावले; शिंदेंवरही डागली तोफ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.