मुंबई Uddhav Thackeray : मुंबईतील कुर्ला येथील कुर्ला मिल मैदानावर जैन श्वेतांबर तेरा पंथ सभा आणि जैन तेरा पंथ ट्रस्ट, तेरा पंथ महिला मंडळ यांच्या वतीने महाश्रमण समवसरण आध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आलं होतं. जैन धर्मगुरूंच्या या प्रवचनाला सोमवारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. ( Uddhav Thackeray criticism of BJP)
सोहळ्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होईल : यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जैन धर्मगुरूंच्या या प्रवचनाला आपण उपस्थित राहिल्यानं काहीजण या सोहळ्याला राजकीय रंग देण्याचा निश्चितच प्रयत्न करतील. आजच्या या प्रवचनाच्या उपस्थितीवरून टीका करण्याचा प्रयत्न करतील. जैन समाजाकडून आणि धर्मगुरूंकडून निश्चितच आपल्याला मतांची अपेक्षा आहे. मात्र, त्यापेक्षाही जैन धर्मगुरू आणि समाजाचे आशीर्वाद आपल्याला हवे असून, त्या व्यतिरिक्त काहीच नको. माझ्या आई-वडिलांना माझा अभिमान वाटेल इतकेच काम मला करायचं आहे आणि ते माझं कर्तव्य आहे, असं ठाकरे यावेळी म्हणाले.
हुकूमशाहीला रोखा : देश सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. देशावर कोट्यवधी रुपयांचा कर्जाचा बोजा झाला आहे. तर दुसरीकडे देशातील नागरिकांवर अत्याचार केले जात आहेत, हा देश आता आपल्याला वाचवायचा आहे. यावेळी जर आपण चूक केली तर देश पुन्हा एकदा हुकूमशाहीच्या हाती जाईल ,अशी भीती ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. देशात पुन्हा हुकूमशाही आली तर देशातील सद्भावना, नीतिमत्ता संपून जाईल आणि सगळीकडं अराजकता पसरेल, अशी भीतीही उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त करत भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.
हेही वाचा: