ETV Bharat / state

Uddhav Thackeray : आम्ही कोणाच्या घरावर जात नाही, फडणवीसांनी आपले घर सांभाळावे- उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा - ठाकरे गट शिवसेना

मुंबईतील शिवाजी मंदिर नाट्यगृहातील एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यांवर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान आणि अमित शाह यांचे मेहबुबा मुफ्तीसोबतचे फोटो दाखवले.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 24, 2023, 1:10 PM IST

Updated : Jun 24, 2023, 1:47 PM IST

मुंबई : गुरुवारी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक झाली, या बैठकीला उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. त्या बैठकीच्यावेळी उद्धव ठाकरे हे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजुला बसले होते. त्यावरुन राज्यातील भाजपने उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिंदुत्व टीका केली होती. त्याचबरोबर पाटण्यात उद्धव ठाकरे परिवार बचाव बैठकीवर गेले होते. त्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी गर्भित इशारा दिला आहे. देवेंद्रजी तुम्हालाही परिवार आहे. तुमच्या परिवाराचे पण व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्याविषयी अजून बोललो नाही. त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दादरच्या शिवाजी मंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला.

परिवारावर जाऊ नका : देवेंद्रजी तुम्हालाही परिवार आहे. तुमच्या परिवाराचे पण व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्याविषयी अजून बोललो नाही. त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल. तुम्हाला कोणतीही आसन झेपणार नाही. फक्त झोपावे लागेल असा गर्भित इशारा ठाकरेंनी दिला. मुंबईतील दादरमधील शिवाजी मंदिरात ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला संबोधित करत असताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना इशारा दिला. आपण सर्वजण परिवाराबाबत संवेदशनील आहे. मीही आहे. सूरज आणि शिवसैनिक हे माझे कुटुंब आहे. मी माझ्या कुटुंबाची काळजी घेईल. आम्ही कोणाच्या घरात जात नाहीत. जर घर आणि परिवारावर बोलून तर तुम्हाला फक्त योगासन करावे लागले, तेही शवासनमी परिवाराबाबत संवेदशनील आहे. शिवसैनिक माझे कुटुंब आहे. माझ्या कुटुंबाची मी काळजी घेईल. परिवाराबद्दल बोलू नका. अनेकांचे अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाणे महापालिकेची चौकशी करा : गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून मुंबईच्या महानगरपालिकेच्या कारभारावरुन प्रश्न उपस्थित करत आहे. मुंबई पालिकेत कोविड कारभारत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई महापालिकेची चौकशी करत असाल तर नक्की करा पण त्याचबरोबर ठाणे महापालिकेचेही चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. ठाणे महापालिकेच्या चौकशीची मागणी तेथील आमदार केळकर यांनी केली होती. परंतु आता त्याला कोणी विचारत नाही. जर तुम्ही मुंबई महापालिकेच्या चौकशी करत असाल तर राज्यातील इतर महानगरपालिकेच्या कारभाराची चौकशी करा. देशातील इतर राज्यात असलेल्या इतर महानगरपालिकेच्या चौकशी केली पाहिजे.

मग पीएम केअर फंडाचा हिशोब द्या : कोविड19 च्या काळात जर मुंबई महानगरपालिकेच्या कारभावर टीका करत असला तर त्यावेळी एपेडिमक अॅक्ट लागू होता. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी पीएम केअर फंडाची स्थापना केली होती. पीएम केअर फंडात आलेल्या निधीची चौकशी देखील केली गेली पाहिजे. त्या फंडाचे नाव बदलून प्रभाकर मोरे फंड असे करावे, असेही उद्धव ठाकरे म्हणालेत.

हेही वाचा -

  1. Sanjay Raut On PM Modi : मणिपूर जळते तरी पंतप्रधान दौऱ्यावर; अमित शाहांनी मणिपूरमध्ये लावावी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक - संजय राऊत
  2. Owaisi Criticized Thackeray : विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी झाल्याने ओवैसींनी उद्धव ठाकरेंना सुनावले खडेबोल

Last Updated : Jun 24, 2023, 1:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.