ETV Bharat / state

...तर 24 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार - उद्धव ठाकरे

author img

By

Published : Nov 9, 2019, 4:23 PM IST

अयोध्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी आज ९ नोव्हेंबर हा आपल्या भारतामध्ये इतिहासातला एक सोन्याच्या अक्षराने लिहून ठेवणारा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जो एक वाद सुरू होता, त्या वादावर आज पडदा पडलेला आहे आणि मी सर्वप्रथम न्यायदेवतेला अक्षरशः साष्टांग दंडवत घालत आहे, असे सांगितले.

उद्धव ठाकरे

मुंबई - गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वाद आता संपुष्टात आला असून वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यानंतर अयोध्या वाद मिटल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच 24 नोव्हेंबरला परत एकदा अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ठाकरे बोलत होते. त्यांनी आज ९ नोव्हेंबर हा आपल्या भारतामध्ये इतिहासातला एक सोन्याच्या अक्षराने लिहून ठेवणारा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जो एक वाद सुरू होता, त्या वादावर आज पडदा पडला आहे आणि मी सर्वप्रथम न्यायदेवतेला अक्षरशः साष्टांग दंडवत घालत आहे, असे सांगितले. न्यायदेवतेने दिलेला न्याय आनंददायी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रभू रामचंद्र यांचा नेमका जन्म कुठे झाला होता, याच्यावरून वाद सुरू होता आणि मला नक्कीच आनंद आहे, की तो वाद आज संपला आहे. सर्व समाजाने हिंदू, मुसलमान, इतर सुद्धा सर्व धर्म आहेत, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो, कारण न्यायदेवतेने दिलेला हा निकाल सर्वांनी स्वीकारलेला आहे, असेही ठाकरेंनी सांगितले.

Intro:Body:

uddhav thackeray

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.