ETV Bharat / state

Shivsena VBA Alliance : शिवशक्ती - भीमशक्तीने कुणाच्या जागा वाढणार ? आज युतीची घोषणा होण्याची शक्यता

आगामी काळात जर शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र थाटायची असेल तर आधी जागांचा तिढा सोडवावा वागेल. त्यातच जर रिपब्लिकन ऐक्याची नेहमीची हाक दिली गेली, तर आंबेडकर सोबत राहणार का?, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Shivsena VBA Alliance
Shivsena VBA Alliance
author img

By

Published : Dec 8, 2022, 10:32 PM IST

Updated : Jan 23, 2023, 11:09 AM IST

मुंबई : शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र करण्याचा प्रयत्न शिवसेनेने यापूर्वीच केला आहे. महाराष्ट्रात सत्तेची गणित जुळवायची असतील तर शिवशक्ती सोबत भीमशक्ती येणे अत्यंत गरजेचे आहे याची जाणीव दोन्ही बाजूंना आहे. मात्र व्यक्तिगत महत्त्वकांक्षा नेहमीच या प्रयोगात अडचणीची ठरल्याचे दिसते. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार आहे.

  • शिवशक्ती आणि भीमशक्तीचा
    एल्गार!!
    संयुक्त पत्रकार परिषद
    23 जानेवारी
    12.30
    आंबेडकर भवन
    नायगाव..
    महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व.. pic.twitter.com/PYkNeNAO0Y

    — Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ठाकरे - आंबेडकर जुनी मैत्री : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधन ठाकरे यांच्यातही मैत्री होती. सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोघांच्या वारसांना एकमेकांची गरज आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून 'शिवशक्ती-भीमशक्ती' एकत्र करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सुरुवातीला हे नेते रामदास आठवले यांच्यासोबत असल्याचा आभास देण्याचा प्रयत्न केला, पण आठवले भाजपासोबत गेल्यावर त्यांना दार लावून घेण्यात आले. अशा परिस्थितीत आंबेडकर आणि ठाकरे यांच्या तिसर्‍या पिढीने एकत्र येऊन पुन्हा नव्याने शिवशक्ती भिमशक्तीचा प्रयोग सुरू केला. यावेळी दोघांनाही एकमेकांची गरज आहे.

वंचितची लोकसभेची आकडेवारी काय सांगते? : २०१९ मधील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी औरंगाबाद मतदारसंघाच्या एका जागेवर एआयएमआयएम तर बाकीच्या ४७ जागांवर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवार उभे होते. AMIM चे इम्तियाज जलील विजयी झाले. मात्र, इतर कोणताही उमेदवार जिंकू शकला नाही. मात्र ही निवडणूक लक्षणीय ठरली ती वंचितच्या उमेदवारांना मिळालेल्या ४१,३२,२४२ (७.६४%) एवढ्या प्रचंड मतांमुळे. राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ८० हजारांहून अधिक मते घेतली. वंचितच्या ४७ उमेदवारांना ३७,४३,२०० एवढी मते मिळाली. हे महाराष्ट्रातील एकूण मतांच्या ६.९२% व वंचितने लढलेल्या ४७ मतदार संघातील (औरंगाबाद वगळून) मतांच्या ७.०८% होते. महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात ५,४०,५४,२४५ एवढे एकूण मतदान झाले होते, त्यामध्ये औरगांबाद मतदार संघात ११,९८,२२१ मतदान झाले होते. नांदेड, सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली-चिमूर, बुलडाणा, हातकणंगले या आठ मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहून पराभूत झाले आहेत. या मतदारसंघांमध्ये आघाडीचा उमेदवार जितक्या मतांनी पराभूत झाली त्याहून अधिक मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली आहेत.

विधानसभेची आकडेवारी काय सांगते? : २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठीच्या जागा वाटपावरुन वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांची युती सप्टेंबर २०१९ मध्ये तुटली. विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी २३४ जागांवर मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केले होते. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला विजय मिळाला नाही. मात्र या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना २४ लाखांपेक्षा अधिक मते (४.६%) मिळाली. १० मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना क्रमांक दोनची मते मिळाली होती, तर अनेक मतदारसंघांत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. याशिवाय राज्यातील जवळपास २१ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयी आणि पराभूत उमेदवार यांच्या मतातील फरकाहून अधिक मतं मिळाली होती.

शिवसेनेची स्थिती काय आहे ? : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत निवडणूक लढवूनही शिवसेनेला केवळ 56 जागांवर समाधान मानाव लागलं होतं. या निवडणुकीत शिवसेनेला 90 लाख 49 हजार 789 मते मिळाली होती. ही मतांची टक्केवारी 16.41 इतकी होती. तर या निवडणुकीत शिवसेनेची सुमारे सव्वातीन टक्क्यांनी मतांची घट पाहायला मिळाली. विशेषतः भीमशक्ती सोबत नसल्याने शिवसेनेला विदर्भात विशेषत: अकोला, अमरावती पट्ट्यात फारशी मदत झाली नाही.

जागा वाटपामुळं युतीचं घोडं अडलं ? : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व प्रमुख्याने अकोला, नागपूर, अमरावती, नांदेड या भागात सर्वाधिक आहे. हाच भाग पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. काँग्रेसची इथं हक्काची वोट बँक आहे. मात्र 2019 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या याच वोट बँकेला वंचित बहुजन आघाडीमुळे धक्का बसला होता. त्यामुळे या भागात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळे आगामी काळात जर शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र थाटायची असेल तर आधी जागांचा तिढा सोडवावा वागेल. त्यातच जर रिपब्लिकन ऐक्याची नेहमीची हाक दिली गेली, तर आंबेडकर सोबत राहणार का?, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

समाज जोडण्यासाठी शिवशक्ती-भीमशक्ती आवश्यक - डॉक्टर गोऱ्हे : दरम्यान या संदर्भात शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. काही जागांबाबत चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय लवकरच होईल. मात्र जर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली तर महाराष्ट्रासाठी आगामी राजकारणासाठी ती अत्यंत सकारात्मक बाब असेल. समाज जोडण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आणि लोकशाहीच्या संविधानाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे असेल, असेही त्यांनी सांगितले.

Last Updated : Jan 23, 2023, 11:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.