ETV Bharat / state

मालाडच्या आक्सा समुद्रकिनारी बुडणाऱ्या दोघांना जीव रक्षकांनी वाचवले - sea

आक्सा समुद्रकिनारी क्रिकेट खेळून झाल्यावर हे तरुण पोहायला पाण्यात उतरले. पण, खोल पाण्यात गेल्यानंतर ते बुडायला लागले. ते खोल पाण्यात जात असतानाच जीव रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता

जीव वाचवून तरुणाला किनाऱ्यावर आणले गेले
author img

By

Published : Apr 28, 2019, 3:28 PM IST

मुंबई - आक्सा समुद्रकिनारी बुडणाऱ्या दोन तरुणांना जीव रक्षकांनी वाचवले. ही घटना आज सकाळी घडली. हे तरुण मालाडच्या आक्सा समुद्र किनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जीव रक्षकांनी तरुणांचे प्राण वाचवले

आक्सा समुद्रकिनारी क्रिकेट खेळून झाल्यावर हे तरुण पोहायला पाण्यात उतरले. पण, खोल पाण्यात गेल्यानंतर ते बुडायला लागले. ते खोल पाण्यात जात असतानाच जीव रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. पण, तरुणांनी न ऐकताच पाण्यात प्रवेश केला. बुडणाऱ्या तरुणांना रक्षकांनी रेस्क्यू ट्यूबच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढले.

बाहेर काढताच त्यांना तात्काळ १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेने कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. जीवरक्षक पर्यवेक्षक स्वतेज कोळंबकर, एकनाथ तांडेल,जीवरक्षक चिराग पागदरे, तुषार मेहेर,रुतिक नशीबा, नथुराम सुर्यवंशी या जीव रक्षकांनी त्या दोन तरुणांना सुखरूप बाहेर काढले.

Intro:मालाड पश्चिमेकडील आक्सा समुद्रकिनारी आज सकाळी बुडणाऱ्या दोन तरुणांना समुद्रावर तैनात असलेल्या जीव रक्षकांनी प्रसंगावधन राखत वाचवले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.Body:आक्सा समुद्रकिनारी क्रिकेट खेळून झाल्यावर हे तरुण पोहायला पाण्यात उतरले व खोल पाण्यात जाऊ लागले. ही बाब जीव रक्षकांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले. बुडू लागताच बचावासाठी आरडाओरडा करताच जीव रक्षकांनी त्यांना रेस्क्यू ट्युबच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.Conclusion:बाहेर काढताच त्यांना तात्काळ 108 नंबरच्या रुग्णवाहिकेने कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
जीवरक्षक पर्यवेक्षक स्वतेज कोळंबकर, एकनाथ तांडेल,जीवरक्षक चिराग पागदरे, तुषार मेेहेर,रुतिक नशीबा, नथुराम सुर्यवंशी या जीव रक्षकांनी त्या दोन तरुणांना सुखरूप बाहेर काढले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.