मुंबई - पवईत जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर एका धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. दुचाकीस्वाराने वेळीच गाडीवरुन उडी घेतल्याने कोणतीही जीवितहानी नाही. सकाळी साडे सहा वाजता ही घटना घडली.
हेही वाचा - एसी' वापरणे टाळा; आरोग्य विभागाच्या सरकारी कार्यालयांना सूचना
दुचाकीस्वार पवई तलाव येथून गांधीनगरच्या दिशेने जात होता. मोटरसायकलच्या इंजिनमधून धूर येऊ लागल्याने चालकाने गाडी थांबवली. त्यानंतर लगेचच दुचाकीने पेट घेतला. या घटनेत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. स्थानिकांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. यामुळे काही काळ जोगेश्वरी-विक्रोळी रोडवर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.