ETV Bharat / state

National Legislative Conference : राष्ट्रीय विधायक संमेलनासाठी देशातील जवळपास 2 हजार आमदार येणार मुंबईत

author img

By

Published : Jun 15, 2023, 1:11 PM IST

भारतातील सर्व विधानसभांचे अध्यक्ष व विधानपरिषदांचे सभापती यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहेत. केसी जीओ कव्हेन्शन सेंटर' मध्ये हे संमेलन होत आहे. या संमेलनात 40 समांतर चर्चासत्र आणि परिषदा होणार आहेत.

jiO कन्व्हेन्शन सेंटरमध्ये राष्ट्रीय विधायक संमेलन

मुंबई : नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील 2000 पेक्षा जास्त आमदार राष्ट्रीय विधायक संमेलनामध्ये एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर विचारविनिमय करणार आहेत. पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटतर्फे राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत मुंबई येथील 'बीकेसी जीओ कव्हेन्शन सेंटर' मध्ये 15 ते 17 जून 2023 या दरम्यान होत आहे.

हे नेते आहेत मार्गदर्शक मंडळात : भारतातील सर्व विधानसभांचे अध्यक्ष व विधानपरिषदांचे सभापती यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहेत. राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीचा सर्वांगीण शाश्वत विकास या विचार त्रिसुत्रीचा प्रमुख उद्देश ठेऊन आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचा उद्घाटन सोहळा आज होणार आहे. तर 17 जून रोजी या संमेलनाचा समारोप होणार आहे. या संमेलनात 40 समांतर चर्चासत्र आणि परिषदा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या विधायक संमेलनाच्या मार्गदर्शक मंडळात लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, मनोहर जोशी, डॉ. मीरा कुमार, लोकसभेचे सध्याचे सभापती ओम बिर्ला, शिवराज पाटील चाकुरकर यांचा समावेश आहे.

या विषयांवर होणार चर्चा : या राष्ट्रीय विधायक संमेलनात कोणत्या विषयांवर चर्चा होईल, याची माहिती देखील आयोजकांनी दिली आहे. या चर्चेच्या विषयांमध्ये शाश्वत विकासाची साधने आणि प्रभाव, सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन या दोन मुख्य विषयांसह कल्याणकारी योजना शेवटच्या व्यक्तीचे उत्थान आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कौतुकास्पद विधानपद्धती यावर चर्चा होणार आहे. कार्य आणि जीवन संतुलन: यशाची गुरुकिल्ली, आपला मतदारसंघ विकसित करण्याची कला आणि कौशल्य, आपली प्रतिमा तयार करा: साधने आणि तंत्रे, विधिमंडळ कार्यप्रदर्शन: अपेक्षेनुसार जगणे आणि सामाजिक कल्याणासाठी सहयोग तसेच नोकरशहा आणि आमदार.

या विषयांवर चर्चा होणार : गोलमेज परिषदेत भारत 2047 : आमचे लक्ष : सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची चर्चा, राजकारणाचे अध्यात्मिकीकरण : अध्यात्मिक नेत्यांची चर्चा, अमृत कालमध्ये भारताचे परिवर्तन : व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील लिडर्सची चर्चा, विधिमंडळाचे कामकाज आव्हाने आणि पुढील मार्ग सर्व राज्य विधानमंडळांच्या सचिवांची चर्चा, भारत 2047 : आमचे लक्ष : सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची चर्चा, माध्यम 2047 : भूमिका आणि जबाबदार्या : संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांची चर्चा, कायदा आणि नागरिक 2047 : आमचे लक्ष : कायदेशीर तज्ज्ञांची चर्चा होणार आहे. या चर्चेच्या प्रत्येक सत्रात देशातील 50 आमदार चर्चेला सहभागी होतील. त्याचप्रमाणे प्रत्येक सत्राचे अध्यक्ष पद विधानसभेचे सभापती, विधानपरिषदेचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते हे भूषविणार आहेत. राष्ट्रीय विधायक संमेलनात आतापर्यंत भारतातील सर्व राज्यातील एकूण 1 हजार 700 आमदारांनी या संमेलनात सहभागासाठी नोंदणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.