ETV Bharat / state

Robber Arrest : दरोड्यासाठी सुट्ट्यांचा मुहूर्त, पोलिसांनी पकडून तुरुंगात धाडला; दोन दरोडेखोरांना रंगेहात अटक - बंद घरांवर दरोड्याची तयारी

दिवाळीच्या सुट्टी निमित्त मुंबईतून बाहेरगावी किंवा फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या बंद घरांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत (Preparations for robbery on closed houses) असलेल्या चव्हाण आणि काळे टोळीतील दोन जणांना अटक (two robbers arrested) करण्यात मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील कस्तुरबा मार्ग पोलिसांना यश मिळाले आहे. या टोळीतील इतर तीन जण फरार झाले. (Robber on the run) (latest news Mumbai), (Mumbai Crime)

Robber Arrest
Robber Arrest
author img

By

Published : Oct 26, 2022, 7:38 PM IST

मुंबई : दिवाळीच्या सुट्टी निमित्त मुंबईतून बाहेरगावी किंवा फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या बंद घरांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत (Preparations for robbery on closed houses) असलेल्या चव्हाण आणि काळे टोळीतील दोन जणांना अटक (two robbers arrested) करण्यात मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील कस्तुरबा मार्ग पोलिसांना यश मिळाले आहे. या टोळीतील इतर तीन जण फरार झाले (Robber on the run) असून या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरूच आहे. गुन्हा करण्यासाठी आणलेली हत्यारे व शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. (latest news Mumbai), (Mumbai Crime)

तीन जणांचा शोध सुरू : काही इसम दरोडा टाकण्यासाठी बोरिवली येथील हयुदाई शोरूम, बडोदा बँकेच्या समोर, दत्तपाडा रोड येथे एकत्र येणार असल्याची माहिती कस्तुरबा मार्ग पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी पंच आणि तपासाची टीम तयार करून त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी बडोदा बँकेच्या समोर अंधारामध्ये काही संशयित एका ऑटो रिक्षाने आले. बडोदा बँकेच्या एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्री झाल्याने तसेच त्यांच्या हालाचाली संशयास्पद दिसून लागल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला व दोन आरोपींना अटक केली. इतर तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. फरार आरोपींचा कस्तुरबा मार्क पोलीस तपास करत आहेत.

ही आहेत आरोपींची नावे : करन महादेव चव्हाण (वय २१ वर्षे), प्रकाश शामा चव्हाण (वय २२ वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून या दोघांकडून पोलिसांनी लोखंडी तार कटर, स्क्रू ड्रायव्हर आणि गॅस कटर, पकड अशी हत्यारे हस्तगत केली आहेत. तर गोपी विजय चव्हाण (वय २१ वर्षे), गोविंद काळे (वय ४५ वर्षे), राहुल रमेश काळे (वय २२ वर्षे) अशी फरार झालेल्या आरोपींची नावे असून सर्व आरोपी सोलापूर जिल्ह्यातील असून ते खास चोरी करण्यासाठी मुंबईत येत असत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.