ETV Bharat / state

आज...आत्ता... दुपारी २ पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर... - jotiryadity sindhiya

संजीव पुनाळेकरांच्या अटकेचा सनातनकडून निषेध, के. पी. यादव आहेत चंद्रपूरचे जावई, ज्योतिरादित्य सिंधियांना केले पराभूत, जगनमोहन रेड्डींनी दिल्लीत घेतली नरेंद्र मोदींची भेट, संपत्तीच्या वादातून मुंबईत भरदुपारी गोळ्या झाडून हत्या, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात सर्वाधिक 'फाशी'च्या शिक्षा माफ

दुपारी २ पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...
author img

By

Published : May 26, 2019, 2:13 PM IST

संजीव पुनाळेकरांच्या अटकेचा सनातनकडून निषेध

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अॅड. संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना काल अटक केली होती. या अटकेचा सनातन संस्थेने निषेध केला आहे. वाचा सविस्तर

के. पी. यादव आहेत चंद्रपूरचे जावई, ज्योतिरादित्य सिंधियांना केले पराभूत

चंद्रपूर - मोदींच्या त्सुनामीसमोर काँग्रेसची धुळदान झाली. यात अनेक दिग्गज नेत्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोर जावे लागले. यापैकीच एक होते ते मध्यप्रदेशातील ज्योतिरादित्य सिंधिया. त्यांना पराभूत केले आहे चंद्रपूरचे जावई के. पी. यादव यांनी. या अनपेक्षित विजयामुळे त्यांचे सासरे सेवानिवृत्त प्राध्यापक जांभूळकर यांच्या घरी सध्या जल्लोषाचे वातावरण आहे. वाचा सविस्तर

जगनमोहन रेड्डींनी दिल्लीत घेतली नरेंद्र मोदींची भेट

नवी दिल्ली - वायएसआरसीचे (युवाजन श्रमिक रयथू काँग्रेस) प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली. यावेळी पक्षातील अन्य नेतेही उपस्थित होते. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत १७५ पैकी १५१ जागा जिंकून जगनमोहन यांनी चंद्राबाबू नायडू यांना जोर का झटका दिला आहे. या त्यामुळे जगनमोहन हे लवकरच आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. वाचा सविस्तर...

संपत्तीच्या वादातून मुंबईत भरदुपारी गोळ्या झाडून हत्या

मुंबई - साकिनाका येथील नाहर सिटी परिसरात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. इब्लिस शेख (५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. वाचा सविस्तर...

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात सर्वाधिक 'फाशी'च्या शिक्षा माफ

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यानंतर, राष्ट्रपती यांच्याकडे याबाबत दया याचिका दाखल करण्यात येते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त दया याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले. याची नोंद माहिती अधिकारातून मिळाली आहे. मागील 38 वर्षांमध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात सर्वाधिक म्हणजे एकूण 19 आरोपींना फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्यात आले आहे. वाचा सविस्तर..

Intro:Body:

News 2 pm

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.