मुंबई - येथील पवई तलाव परिसरात २ लहान मुलांजवळ जखमी अवस्थेत असलेल्या कासवांची 'प्लँट अॅन्ड अॅनिमल वेलफेयर सोसायटी मुंबई (पॉज-मुंबई)' आणि अम्मा केअर फाउंडेशनच्या मदतीने सुटका करण्यात आली आहे.
पवई तलावजवळील जखमी २ कासवांची प्राणी संस्थेच्या मदतीने सुटका करण्यात आली. मुंबईतील पवई परिसरातून 'प्लँट अॅन्ड अॅनिमल वेलफेयर सोसायटी मुंबई (पॉज-मुंबई)' आणि 'अम्मा केअर फाउंडेशन' पवई तलाव परिसरात दोन लहान मुलांजवळ जखमी अवस्थेत असलेल्या कासवांची पवईतून सुटका केली आहे. सोमवारी पवई तलावाजवळ दोन मुले ही दोन कासवांसोबत संशयितरित्या पॉज संस्थेच्या सदस्या सविता यांना दिसली. त्यांनी लागलीच त्या कासवांबद्दल मुलांकडून माहिती घेतली. हे दोन्ही कासव जखमी अवस्थेत होते. त्यांनी त्या कासवांना ताब्यात घेत त्याची तपासणी केली असता कासवाच्या तोंडात सेफ्टी पिन अडकल्या होत्या. त्या कासवांना पॉज संस्थेच्या मार्फत पशु वैद्यकीय यांच्याकडे नेण्यात आले. कासवांच्या तोंडातून त्या पिन्स सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्या असून जखम झालेल्या ठिकाणी औषधोपचार करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'सरकार आता शेतकऱ्याच्या नरडीचा घोट घेणार काय?'
कासवांच्या तोंडाला कुठलीही अंतर्गत जखम किंवा सूज आढळून आली नाही. सध्या दोन्ही कासव सामान्य असून त्यांचा आहारही योग्य पद्धतीने सध्या सुरू आहे. काही दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. या जखमी कासवांबद्दल वन विभागाला कळविण्यात आले असून त्यांना लवकरच त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे पॉज संस्थेच्या सदस्यांनी यावेळी सांगितले.