ETV Bharat / state

मुंबई कोरोना अपडेट : आज मुंबईत 299 नवे रुग्ण; दीड वर्षातील सर्वात कमी रुग्णांची नोंद

author img

By

Published : Jul 26, 2021, 10:08 PM IST

कोरोनाच्या पहिल्या लाटेतील सर्वात कमी 328 रुग्ण यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आढळून आले होते. त्यानंतर आज सोमवारी 26 जुलैरोजी गेल्या दीड वर्षातील सर्वात कमी म्हणजेच 299 रुग्णांची नोंद झाली आहे.

mumbai corona patient news
दीड वर्षातील सर्वात कमी रुग्णांची नोंद

मुंबई - गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील सर्वात कमी 328 रुग्ण यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आढळून आले होते. त्यानंतर आज सोमवारी 26 जुलैरोजी गेल्या दीड वर्षातील सर्वात कमी म्हणजेच 299 रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर रुग्ण दुपटीचा कालावधी 1324 दिवसांवर पोहचला असल्याने मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी 1324 दिवसांवर -

मुंबईत आज 299 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 34 हजार 418वर पोहचला आहे. आज 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 784 वर पोहचला आहे. आज 501 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 7 लाख 10 हजार 849वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 5 हजार 397 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 1324 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 3 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 60 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 24 हजार 989 तर आतापर्यंत एकूण 79 लाख 90 हजार 319 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

अशी होत आहे रुग्णसंख्या कमी -

4 एप्रिलरोजी 11,163, 7 एप्रिलरोजी 10428, 1 मे रोजी 3908, 21 जून रोजी 521, 5 जुलै रोजी 489, 13 जुलै रोजी 441 तर आज 26 जुलै रोजी 299 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी 18 जानेवारी रोजी 395, 24 जानेवारी रोजी 348, 26 जानेवारी रोजी 342, तर 1 फेब्रुवारी रोजी 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले होते.

हेही वाचा - राज्यात एक कोटी पूर्ण 'लसवंत', 3.16 कोटी लोकांना मिळाला पहिला डोस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.