ETV Bharat / state

विक्रोळीत दोन तोतया क्लीनअप मार्शल पोलिसांच्या ताब्यात

author img

By

Published : Aug 14, 2020, 12:00 PM IST

विक्रोळी येथे दोन तोतया क्लीनअप मार्शल(स्वच्छता रक्षक) हे सामान्य नागरिकांना लुटत असल्याचे समोर आले. या मार्गावरून प्रवास करत असताना एका वृत्तवाहिनीचे रिपोर्टरने या तोतया क्लीनअप मार्शलना जाब विचारत, त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला.

Criminals
आरोपी

मुंबई - पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी येथे दोन तोतया क्लीनअप मार्शल(स्वच्छता रक्षक) हे सामान्य नागरिकांना लुटत असल्याचे समोर आले. या मार्गावरून प्रवास करत असताना एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टरने या तोतया क्लीनअप मार्शलना जाब विचारत, त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला. त्यानंतर महानगरपालिकेसह पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि अखेर त्या तोतया क्लिनअप मार्शलांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सुफियान नखवा(वय २५) आणि विक्रम कुठे(वय २८), अशी या तोतया क्लीनअप मार्शलची नावे आहेत. या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक करत विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. १० ऑगस्ट रोजी पूर्व द्रुतगती मार्गवर विक्रोळी जवळ सागर परमार आणि संजय जेठवा या दोन सामान्य नागरिकांनी लघवी केली, मास्क घातला नाही, सिगरेट पिले, अशी कारणे देत या आरोपींनी पकडले होते. आरोपींनी नागरिकांकडे प्रत्येकी एक हजार रुपयांची मागणी केली. आपल्याकडे एवढे पैसे नाहीत, अशी विनवणी हे दोघे नागरिक करत होते. आरोपींनी नागरिकांकडून जबरदस्ती चारशे रुपये काढून घेतले. ही झटापट तेथून बातमीसाठी विक्रोळीला जात असलेल्या प्रशांत बढे यांनी पाहिली. त्यांनी तिथे थांबून विचारणा केली असता या तोतया क्लीनअप मार्शल्सनी त्यांना धमकावण्याचा आणि त्यांचा मोबाईल खेचून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जेव्हा बढेंनी पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या बोगस क्लीनअप मार्शल्सनी तिथून पळ काढला.

परिमंडळ सातचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी या घटनेची गंभीर दखल घेत विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आज सुफियान नाखवा(रा. दिवा) आणि विक्रम कुटे (रा. कल्याण) या दोघांना विक्रोळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

महानगरपालिकेच्या एन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी तसेच विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय दळवी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ यांच्या प्रयत्नानंतर हे आरोपी गजाआड झाले. मुंबईकरांनी स्वतःहून पुढाकार घेत सतर्क रहा आणि अशी लुट होत असल्यास त्या विरोधात आवाज उठवा, असे पत्रकाराने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.