मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोनाचा विळखा अखेर सैल झाला आहे. कारण शनिवारी पहिल्यांदाच दोन महिन्यानंतर येथे सर्वात कमी केवळ दोन रूग्ण आढळले. आता धारावी नियंत्रणात आल्याने येथील जनजीवन सुरळीत करणे गरजेचे आहे, असे म्हणत आता मुंबई महानगर पालिकेने सुरक्षित परिसरात शिथिलता दिली आहे. तर कंटेंटमेंट झोनही आता कमी झाले आहेत. त्यामुळे छोट्या उद्योगांचे मोठे केंद्र असलेल्या या धारावीतील उद्योग 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आता सुरू झाले आहेत. हळूहळू याची व्याप्ती वाढवत जनजीवन सुरळीत करण्याकडे आता पालिकेचा कल आहे.
अंदाजे साडे सहा लाख लोकसंख्या असलेल्या धारावीत कोरोनाचा कहर रोखण्यात पालिका यशस्वी ठरली आहे. कारण 23 जूनला येथे सर्वात कमी 5 रूग्ण आढळल्यानंतर 4 जुलैला अवघे 2 रूग्ण आढळले आहेत. ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे. धारावीतील एकूण रूग्ण संख्या आता 2 हजार 311 वर गेली असून सध्या 519 रूग्ण सक्रिय आहेत. तर 1 हजार 704 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मृत्यूच्या आकडेवारीबाबत थोडा गोंधळ आहे. आधीचे मृत्यू ही आता समाविष्ट होत आहेत. त्यामुळे निश्चित आकडेवारी काही दिवसात स्पष्ट होईल असे जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले आहे.
धारावीतील रूग्ण दुप्पटीचा वेग 140 दिवसांवर गेला आहे. तर अॅक्टिव्ह रूग्ण ही कमी झाल्याने आता येथील जनजीवन सुरळीत करणे हेच आता मुख्य लक्ष्य असल्याचे दिघावकर यांनी सांगितले आहे. रूग्ण कमी झाल्याने राजीव गांधी क्रीडा संकुल आणि एका पालिका शाळेतील क्वारंटाईन सेंटर बंद करण्यात आले आहेत. तर कारखाने 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू झाले आहेत. तर यापुढे परिस्थितीचा आढावा घेत उद्योगांना आणखी गती देण्यात येणार असल्याचेही दिघावकर यांनी सांगितले आहे.
धारावीमध्ये शनिवारी आढळले फक्त दोन कोरोना रुग्ण; जनजीवन पूर्वस्थितीत आणण्याचे पालिकेचे लक्ष्य
अंदाजे साडे सहा लाख लोकसंख्या असलेल्या धारावीत कोरोनाचा कहर रोखण्यात पालिका यशस्वी ठरली आहे. कारण 23 जूनला येथे सर्वात कमी 5 रूग्ण आढळल्यानंतर 4 जुलैला अवघे 2 रूग्ण आढळले आहेत. ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे.