मुंबई - मालाड (पूर्व) कुरार पोलिसांनी एका मजनूला आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. या मजनूने आपल्या मैत्रिणीला गिफ्ट करण्यासाठी उबर कारमधून दुचाकी चोरली होती. या घटनेनंतर कुरार पोलिसांनी कारवाई केली. या दोघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक दुचाकी व एक ओलाची कार जप्त केली.
हे दोन्ही आरोपी ओला आणि उबेरची कार चालवतात. 28 डिसेंबर 2020 रोजी मालाड पूर्वमधून दुचाकी चोरीची तक्रार दाखल झाली होती. यावर कारवाई करताना पोलिसांनी दोघांना अटक केली. प्रदीप जगदीश उपाध्याय आणि सर्वेश प्रेम राज उपाध्याय अशी आरोपींची नावे असून ही दोघे संतोष भवन नालासोपारा पूर्वमधील रहिवाशी असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबा साहेब सालुंखे यांनी सांगितले.
प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी दुचाकीची चोरी
प्रदीपची प्रेयसी वारंवार दुचाकीची मागणी करत होती. त्यामुळे त्याने आपल्या मित्रासह मिळून उबेर कारमधून पॅशन प्रो ही दुचाकी चोरी केली. नालासोपारातून चोरी करुन आरोपी फरार झाला. त्या दुचाकीवर त्याने त्याच्या प्रेयसीचे नाव लिहून तिला दिली. प्रदीपवर पोक्सो कायद्यांतर्गत मादक पदार्थांचे सेवन करून मैत्रिणीशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - पालकमंत्री अदिती तटकरे यांनी टाळ मृदुंगावर धरला ताल!