ETV Bharat / state

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव 'ओव्हरफ्लो' - ttulsi lake news

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक असलेला तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे पाणी कपातीची टांगती तलवार असलेल्या मुंबईकरांमधून आता समाधान व्यक्त केला जात आहे.

tulsai lake
तुळशी तलाव
author img

By

Published : Jul 28, 2020, 5:44 PM IST

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तालावांमध्ये दरवर्षीपेक्षा पाणीसाठा कमी असल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. मात्र, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव सोमवारी (दि. 27 जुलै) दुपारी 12 वाजता ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईला पाणीपूरवठा करणाऱ्या तलावामधील हा सर्वात लहान तलाव आहे. समाधानकारक पाऊस पडल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणारे इतरही तलाव भरुन वाहू लागतील, असा विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तुडूंब भरलेल्या तुळशी तलावाचे विहंंगम दृश्य

मुंबईला भातसा, मध्य वैतरणा, तानसा, विहार, मोडक सागर, तुळशी या सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी तुळशी तलाव सोमवारी दुपारी 12 वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला. दरवर्षी हा तलाव जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात भरतो. या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता 139.17 मीटर असून ही पातळी तलावाने सोमवारी दुपारी गाठली. मागील वर्षी 12 जुलैला हा तलाव भरला होता. त्याआधी 9 जुलै, 2018 हा तलाव भरला होता. 2017 मध्ये तो 14 ऑगस्टला भरला होता.

मुंबईला भातसा, मध्य वैतरणा, तानसा, विहार, मोडक सागर, तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी 3 हजार 750 दशलक्ष अर्थात 375 कोटी लिटर एवढा पाण्याचा पुरवठा होतो. भातसा तलावातून सर्वाधिक पाणी पुरवठा होतो. तर तुळशी आणि विहार या दोन तलावांमधून सर्वात कमी पाण्याचा पुरवठा होतो. मंगळवारी (दि. 28 जुलै) सकाळपर्यंत तलावांमध्ये 32.69 टक्के एवढा पाण्याचा साठा जमा झाला आहे. आत्तापर्यंत सातही तलावांमध्ये मिळून 4 लाख 73 हजार 113 दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. आजच्याच दिवशी 2019 मध्ये धरणामध्ये 10 लाख 89 हजार 155 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा होता.

धारणामधील एकूण पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा - 39 हजार 375
मोडक सागर - 49 हजार273
तानसा - 36 हजार 473
मध्य वैतरणा - 63 हजार 210
भातसा - 2 लाख 59 हजार 193
विहार - 17 हजार 544
तुळशी - 8 हजार 46
एकूण - 4 लाख 73 हजार 113

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.