ETV Bharat / state

राखी पौणिमेनिमित्त टिकाऊ 'वायर' राख्यांचा ट्रेंड, मुंबईत एकमेव विक्रेत्याकडे मागणीचा ओघ

भायखळा येथील एक विक्रेते शेख समशूल हक अब्दुल रझाक यांनी अनोखी राखी विक्रीसाठी उपलब्ध केली आहे.  'वायर राखी' म्हणून ती प्रसिद्ध आहे.

वायर राखी
author img

By

Published : Aug 14, 2019, 12:23 PM IST

Updated : Aug 14, 2019, 2:04 PM IST

मुंबई- रक्षाबंधन एक दिवसावर येऊन ठेपल्याने बाजारपेठा विविध वस्तूंनी आणि राख्यांनी सजल्या आहेत. यावेळी टिकाऊ राख्यांना मोठी मागणी आहे. भायखळा येथील एक विक्रेते शेख समशूल हक अब्दुल रझाक यांनी अनोखी राखी विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. 'वायर राखी' म्हणून ती प्रसिद्ध आहे. अल्युमिनियमच्या तारेपासून बनवलेली व त्यावर नावाचे पहिले आद्याक्षर अशी रचना असलेल्या राख्या ते विकत आहेत.

राखी पौणिमेनिमित्त टिकाऊ 'वायर' राख्यांचा ट्रेंड सध्या आहे.

अशा प्रकारच्या राख्या रझाक यांच्याकडेच उपलब्ध असल्याने मुंबईत त्यांच्या राख्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राखीवर भावाचे नाव लिहून घेण्याचा ट्रेंड हा वाढत आहे. अख्तर यांनी हा ट्रेंड वायर राखीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला आहे. नावाचे पहिले आद्याक्षर ते रखीवर बनवत आहेत. यावर्षी अब्दुल रझाक यांच्या वायर राख्यांना देशभरातून तसेच परदेशातूनही मोठी मागणी मिळत आहे. अल्युमिनियमच्या तारेपासून राख्या तयार केल्या गेल्या आहेत.

अब्दुल रझाक यांनी सांगितले की, आम्ही गेल्या 15 वर्षापासून अल्युमिनियमच्या तारेपासून अनेक वस्तू तयार करतो. ग्राहकाला हवे असेल तसे डिझाईन मी बनवून देतो. मागच्या वर्षी मी विचार केला की यापासून राख्या तयार करता येऊ शकतात. मग ज्या बहिणीला तिच्या भावाला राखी द्यायची आहे. त्या भावाच्या नावाचे पहिले आद्याक्षर असलेली राखी बनवून देऊ लागलो. या नावाच्या राख्याना मोठी मागणी मिळत आहे. तसेच ऑनलाईनही मागणी आहे. वायरच्या माध्यमातून वस्तू तयार करणारा मी मुंबईला एकटाच आहे. या आर्टला मला पुढे आणायचे आहे, असेही रझाक यांनी सांगितले.

Intro:मुंबई ।
रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. बाजारपेठा विविध वस्तूंनी आणि राख्यांनी सजल्या आहेत. यावेळी टिकाऊ राख्यांना मोठी मागणी आहे.भायखळा येथील एक विक्रेते शेख समशूल हक अब्दुल रझाक हे अनोखे राखी घेउन आले आहेत. वायर राखी म्हणून ती प्रसिद्ध आहे. अल्युमिनियमच्या तारेपासून व त्यावर नावाचे पहिले आद्याक्षर अशी रचना असलेल्या राख्या ते विकत आहेत. मुंबईत एकमेव विक्रेते असल्याने त्यांच्या राख्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.....
Body:राखीवर भावाचे नाव लिहून घेण्याचा ट्रेंड हा वाढत आहे. अख्तर यांनी हा ट्रेंड वायर राखीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला आहे. नावाचे पहिले आद्याक्षर ते रखीवर बनवत आहेत.
रक्षाबंधन जवळ आले की बहिणीला राखी खरेदीची घाई लागते. भावाला कोणती राखी बांधायची, याचा विचार बहिणीकडून केला जातो. दरवर्षी बाजारात अनेक राख्या येत असतात. मात्र यावर्षी अब्दुल रझाक यांच्या वायर राख्याना देशभरातून तसेच परदेशातूनही मोठी मागणी मिळत आहे अल्युमिनियमच्या तारेपासून राख्या तयार केल्या गेल्या आहेत.
अनेक वर्षापासून अख्तर अल्युमिनियमच्या तारेपासून अनेक वस्तू तयार करतात. मात्र गेल्या वर्षापासून त्यांनी राखी बनविण्यास सुरुवात केली.
गेल्या 15 वर्षापासून अल्युमिनियमच्या तारेपासून अनेक वस्तू तयार करतो. ग्राहकाला हवे असेल तसे डिझाईन मी बनवून देतो. मागच्या वर्षी मी विचार केला की यापासून राख्या तयार करता येऊ शकतात. मग ज्या बहिणीला तिच्या भावाला राखी द्यायची आहे. त्या भावाच्या नावाचे पहिले आद्याक्षर असलेली राखी बनवून देऊ लागलो. या नावाच्या राख्याना मोठी मागणी मिळत आहे. तसेच ऑनलाइनही मागणी आहे. वायरच्या माध्यमातून वस्तू तयार करणारा मी मुंबईला एकटाच आहे या आर्टला मला पुढे आणायचे आहे असे अब्दुल रझाक यांनी सांगितले

नोट

Video ani vis veg vegle file attach kele ahe

ही बातमी फक्त आपल्याकडे आहे exlusive वापरता येऊ शकते.Conclusion:
Last Updated : Aug 14, 2019, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.