ETV Bharat / state

Tree Cutting At Jogeswari : जोगेश्वरी येथे झाडांच्या मुळावर घाव; इस्माईल युसूफ काॅलेजजवळील घटना - इस्माईल युसूफ काॅलेज वृक्षतोड

जोगेश्वरी पूर्व येथे इस्माईल युसूफ काॅलेज ( Ismail Yusuf College ) जवळ राज्य सरकारच्या माध्यमातून भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. ताडगोळ व वाळवा या झाडाच्या जवळचं खोदकाम सुरु असताना झाडाच्या ( Tree Cutting At Jogeswari ) मुळावर घाव घालण्यात आला. त्यामुळे दोन्ही झाडांना हानी पोहोचली. या घटनेनंतर कंत्राटदाराविरोधात जोगेश्वरी पोलीस ( FIR Against Contractor ) ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Tree Cutting At Jogeswari
Tree Cutting At Jogeswari
author img

By

Published : Mar 28, 2022, 8:19 PM IST

Updated : Mar 28, 2022, 10:53 PM IST

मुंबई - जोगेश्वरी पूर्व येथे इस्माईल युसूफ काॅलेज ( Ismail Yusuf College ) जवळ राज्य सरकारच्या माध्यमातून भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. ताडगोळ व वाळवा या झाडाच्या जवळचं खोदकाम सुरु असताना झाडाच्या ( Tree Cutting At Jogeswari ) मुळावर घाव घालण्यात आला. त्यामुळे दोन्ही झाडांना हानी पोहोचली. या घटनेनंतर कंत्राटदाराविरोधात जोगेश्वरी पोलीस ( FIR Against Contractor ) ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रार दाखल - पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. परंतु मुंबईत सुरु असलेल्या विविध विकास कामांत झाडांचा बळी घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. जोगेश्वरी पूर्व येथील इस्माईल युसूफ कॅलेज जवळचं भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी रस्ता खोदण्यात येत असताना ताडगोळाच्या दोन झाडांना व वाळवाच्या एका झाडाला हानी पोहोचली. याबाबत तक्रारदार प्रदीप जाधव यांनी या घटनेची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाला दिली. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर अंधेरी पूर्व विभागाच्या उद्यान विभागाने संबंधित कंत्राटदारा विरोधात तक्रार दाखल केली आहे. खोदकाम सुरु असलेली जागा इस्माईल युसूफ काॅलेजची असल्याने नोटीस बजावण्यात आल्याचे पालिकेच्या अंधेरी पूर्व उद्यान विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

'झाडांची काळजी घ्या' - पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांचे महत्त्व असून झाडांची कत्तल करणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येते. त्यामुळे झाडांना हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द, रविवारी देखील शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय

Last Updated : Mar 28, 2022, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.