ETV Bharat / state

Colaba to Nariman Point Sea Route: समुद्रामार्गे आता कुलाबा ते नरिमन पॉइंट प्रवास 2024 पर्यन्त सुकर होणार - Colaba to Nariman Point Travel

कुलाबा पासून ते नरिमन पॉईंट (Colaba to Nariman Point Travel) या भागामध्ये प्रचंड वाहतुकीची गर्दी असते आणि दोन किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी सुद्धा 60 मिनिटे वेळ लागतो. त्यामुळे आता समुद्रामार्गे (Travel Via Sea route) कुलाबा ते नरिमन पॉईंट असा प्रवास सुकर होणार आहे. दक्षिण मुंबईतील दोन टोकांना जोडण्यासाठी नरिमन पॉइंट ते कुलाबा असा संपूर्ण सागरी मार्ग उभारण्यात येणार आहे. नुकतीच ३१५ कोटी रुपयांच्या या कामासाठी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा काढली आहे. latest news from Mumbai,

Colaba to Nariman Point Sea Route
कुलाबा ते नरिमन पॉइंट प्रवास
author img

By

Published : Nov 30, 2022, 3:22 PM IST

मुंबई : कुलाबा पासून ते नरिमन पॉईंट (Colaba to Nariman Point Travel) या भागामध्ये प्रचंड वाहतुकीची गर्दी असते आणि दोन किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी सुद्धा 60 मिनिटे वेळ लागतो. त्यामुळे आता समुद्रामार्गे (Travel Via Sea route) कुलाबा ते नरिमन पॉईंट असा प्रवास सुकर होणार आहे. कारण एमएमआरडीने 315 कोटीची निविदा जाहीर केली आहे. यामुळे हा सागरी रस्ता (Colaba to Nariman Point sea route) काम लवकर सुरू होणार आहे. latest news from Mumbai

एमएमआरडीने निविदा काढली : मंत्रालय विधान भवन ज्या परिसरात आहेत तो दक्षिण मुंबईतील दोन टोकांना जोडण्यासाठी नरिमन पॉइंट ते कुलाबा असा संपूर्ण सागरी मार्ग उभारण्यात येणार आहे. नुकतीच ३१५ कोटी रुपयांच्या या कामासाठी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा काढली आहे. एयर इंडिया इमारत जवळून उभे राहून पाहिले की समुद्राच्या पलीकडे कुलाबा-कफ परेड भाग डोळ्यांना दिसतो. परंतु नरिमन पॉइंटहून तेथे पोहोचण्यासाठी तासभराहून अधिक वेळ जातो. चारचाकी वाहनांची संख्या या रहदारीच्या मार्गावर जास्त असते. त्यामुळे प्रवासाला वेळ लागतो.

समुद्रावरून उभारणार नवा मार्ग : विधान भवन परीसरात अनेक कॉर्पोरेट कार्यालये, सरकारी एजन्सी कार्यालये आहेत. या भागात विविध कार्यालये असल्याने कफ परेड ते नरिमन पॉइंट व नरिमन ते पॉइंट ते कुलाबा अशी ये-जा करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. त्यासाठीच आता थेट समुद्रावरून नवा मार्ग टाकला जाणार आहे.

८० टक्के मार्ग समुद्रातून जाणार : एमएमआरडीए महानगर आयुक्त ह्या बाबत ईटीव्ही सोबत सवांद करताना म्हणाले,", हा मार्ग एकूण चार किमी लांबीचा असेल. नरिमन पॉइंटहून अर्ध गोलाकार असे वळण घेतले जाईल. एकूण मार्ग पैकी चार किमीपैकी ८० टक्के मार्ग समुद्रातून जाणार आहे. या मार्गालगत दोन्ही बाजूला जेट्टी, वॉकिंग मार्ग, सायकल ट्रॅकदेखील उभारण्याचे नियोजन आहे. तसेच नरिमन पॉइंट ते कफ परेड या मधल्या जागेत ‘दर्शक दालन’ उभे केले जाणार आहे. याद्वारे अथांग समुद्राचे दृष्य पाहता येणार आहे. हे सर्व काम ३१५ कोटी रुपयांचे असून, ते संबंधित कंत्राटदाराला अडीच वर्षात पूर्ण करायचे आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.