मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या केल्या. डॉ.एन.बी. गीते (2009) सहसचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महानंद मुंबई येथे करण्यात आली आहे. संजय यादव (2009) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर यांना जिल्हाधिकारी, धुळे म्हणून नियुक्त केले आहे.
आयएएस गंगाथरन डी, (2013) जिल्हाधिकारी, धुळे यांची नगर आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, येथे नियुक्त केले आहे. आयएएस योगेश कुंभेजकर, (2016) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजुरा, चंद्रपूर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर येथे नियुक्त केले आहे.
हेही वाचा- न्यूयॉर्क शहरात मागील 24 तासामध्ये तब्बल 731 मृत्यू