मुंबई : उद्योग मंत्री तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा ( Industries Minister Mangal Prabhat Lodha ) यांनी आज प्रतापगडावर झालेल्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Mangal Prabhat Lodha compared CM Eknath Shinde ) आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली. औरंगजेबाच्या तावडीतून ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज सुटले होते. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या तावडीतून एकनाथ शिंदे सुटले, अशी तुलना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची मुख्यमंत्र्यांसोबत ( Aditya Thackeray Criticizes Industry Minister ) केली. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून टीका होत ( After his Statement was Criticized From All Levels ) असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीसुद्धा या वक्तव्याचा समाचार घेतला.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी लोढा यांच्या वक्तव्याचा घेतला खरपूस समाचार : शिंदे गटातील नेत्यांना गद्दार म्हणून ओळखले जाते. तसेच, ही तुलनाच होऊ शकत नाही हा केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांना कमी लेखण्याचा प्रयत्न असून, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना मुख्यमंत्र्यांशी करणे हा एक प्लान आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीमधील पक्षाच्या गटनेत्यांची बैठक विधान भवनात पार पडल्यानंतर त्यांनी ही टीका शिंदे गटावर केली आहे.
उद्योग मंत्र्यांना मंत्री म्हणून काम करताना पाहिले नाही : पॉपकॉर्न प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर त्याबाबतचे राजकारण अद्यापि शांत झालेले दिसत नाही. आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प बाहेर जाण्यासाठी सध्याचे सरकार जबाबदार असल्याची टीका केली होती. यावर उद्योग मंत्री यांनी संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांबरोबर कोणताही एमओयू झाला नव्हता असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, उद्योग मंत्र्यांना आपण कधीही राज्यात उद्योग मंत्री म्हणून काम करताना अद्यापि बघितलेले नाही. या सर्व प्रक्रियेतून उद्योग मंत्री बाहेरच असतात, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेची तयारी : तसेच राज्यातील उद्योगाबाबतची परिस्थिती आणि बाहेर गेलेल्या प्रकल्पांबाबत आपण कधीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायला तयार आहोत. यासाठी माझ्याकडून सर्व कागदपत्रे तयार असल्यासही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.