ETV Bharat / state

रस्त्यांचा दर्जा सुधारणार? पालिका अभियंत्यांना आयआयटीकडून मिळणार प्रशिक्षण - घोटाळा

मुंबई शहरातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी पालिका अभियंत्यांना आयआयटीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नामांकित अशा आयआयटी या संस्थेकडून 'बांधकाम आणि दर्जा' या विषयावर हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर प्रशासनाने मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेतील अभियंत्यांसाठी आयआयटीकडून प्रशिक्षण
author img

By

Published : Apr 21, 2019, 5:20 PM IST

मुंबई - शहरातील रस्ते चांगल्या प्रकारचे नसल्याची तक्रार नेहमीच महानगरपालिकेकडे येत असते. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाच्या अभियंत्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. नामांकित अशा आयआयटी या संस्थेकडून 'बांधकाम आणि दर्जा' या विषयावर हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर प्रशासनाने मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेतील अभियंत्यांसाठी आयआयटीकडून प्रशिक्षण

मुंबई महापालिकेत नाले सफाई, ड्रेनिज, ई टेंडरिंग, रस्ते असे अनेक घोटाळे मागील काही वर्षात समोर आले आहेत. मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरातील रस्ते चांगले नसल्याची व पावसाळ्यादरम्यान या रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्ते घोटाळ्यात पालिकेला तब्बल २०० अभियंत्यांवर कारवाई करावी लागली होती. यामुळे पालिकेची चांगलीच नालस्ती झाली होती.

रस्ते घोटाळ्यानंतर आणि पालिकेवर झालेल्या टिकेनंतर पालिकेने रस्ते विभागाचा कारभार चांगला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशातील नामांकित असलेल्या 'आयआयटी'कडून अभियंत्यांना 'बांधकाम आणि त्याचा दर्जा' यावर प्रशिक्षण दिले जाणार आहे. आयआयटी, मुंबई या संस्थेमार्फत अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ९ लाख ४९ हजार ९०० रुपये इतका खर्च केला जाणार आहे. अभियंत्यांना मिळणाऱ्या प्रशिक्षणानंतर मुंबईमधील रस्त्यांची स्थिती सुधारले, मुंबईकर नागरिकांना चांगले रस्ते मिळतील, पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणार नाही, अशी अपेक्षा प्रशासनाची आहे. त्यासाठी हा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीत मंजूर करण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे.

Intro:मुंबई
मुंबई महानगरपालिकेत अनेक घोटाळे गाजले आहेत. या घोटाळ्यात रस्ते घोटाळ्याचाही समावेश आहे. शहरातील रस्ते चांगल्या प्रकारचे नसतात अशी तक्रार नेहमीची केली जाते. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाच्या अभियंत्यांना 'बांधकाम आणि दर्जा' या विषयावर नामांकित अशा आयआयटी या संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर प्रशासनाने मंजुरीसाठी सादर केला आहे. Body:मुंबई महापालिकेत नाले सफाई, डेब्रिज, ई टेंडरिंग, रस्ते असे अनेक घोटाळे गेल्या काही वर्षात समोर आले आहेत. मुंबई सारख्या जागतिक दर्जाच्या शहरातील रस्ते चांगले नसल्याची व पावसाळ्यादरम्यान या रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. रस्ते घोटाळ्यात पालिकेला तब्बल २०० अभियंत्यांवर कारवाई करावी लागली होती. यामुळे पालिकेची चांगलीच नालस्ती झाली होती. रस्ते घोटाळ्यानंतर पालिकेवर झालेल्या टिकेनंतर पालिकेने रस्ते विभागाचा कारभार चांगला करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून देशातील नामांकित असलेल्या 'आयआयटी'कडून अभियंत्यांना 'बांधकाम आणि त्याचा दर्जा' यावर प्रशिक्षण दिले जाणार आहे. आयआयटी मुंबई या संस्थेमार्फत अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ९ लाख ४९ हजार ९०० रुपये इतका खर्च केला जाणार आहे. अभियंत्यांना मिळणाऱ्या प्रशिक्षणानंतर मुंबईमधील रस्त्यांची स्थिती सुधारले, मुंबईकर नागरिकांना चांगले रस्ते मिळतील, पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणार नाही अशी अपेक्षा प्रशासनाची आहे. त्यासाठी हा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीत मंजूर करण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.