ETV Bharat / state

नवनिर्वाचित खासदारांसमोर भांडुपकरांनी वाचला वाहतूक समस्येचा पाढा

भाजपचे नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांनी नुकतीच भांडुप स्टेशन पश्चिम येथील वाहतूक समस्यांसंदर्भात भांडुपकरांची भेट घेतली. यावेळी 'आम्ही भांडुप कर' या तरुणांच्या टीमला खासदारांनी वाहतूक समस्या सोडविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करू व त्यावर पर्यायी मार्ग काढून स्थानकाच्या बाहेरील समस्या सोडवू असे सांगितले.

वाहतूक समस्यांसंदर्भात भांडुपकरांशी चर्चा करतांना भाजपचे खासदार मनोज कोटक
author img

By

Published : Jun 4, 2019, 4:05 PM IST

मुंबई - ईशान्य मुंबईतील भाजपचे नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांनी नुकतीच भांडुप स्टेशन पश्चिम येथील वाहतूक समस्यांसंदर्भात भांडुपकरांची भेट घेतली. यावेळी 'आम्ही भांडुप कर' या तरुणांच्या टीमने त्यांना वाहतूक समस्येची अडचण सांगितली. यावर खासदारांनी वाहतूक समस्या सोडविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करू व त्यावर पर्यायी मार्ग काढून स्थानकाच्या बाहेरील समस्या सोडवू असे सांगितले.

वाहतूक समस्यांसंदर्भात भांडुपकरांशी चर्चा करतांना भाजपचे खासदार मनोज कोटक

गेल्या काही महिन्यांपासून 'आम्ही भांडुपकर', या तरुणांनी तयार केलेल्या एका ग्रुपने रिक्षा समस्या व बस समस्या यांवर तोडगा काढण्यासाठी, रोज सायंकाळी 6 ते 11 या वेळेत आपल्या सवडीनुसार भांडुपकरांना रिक्षाची व्यवस्था होईल याची काळजी घेत होते. या स्थानकावर फेरीवाले व रिक्षांच्या अवास्तव रांगांमुळे येथून पायी चालणेही अवघड होऊन जाते. यावर प्रशासन वेळोवेळी प्रयत्न करत असले तरी फेरीवाले फुटपाथवर ठाण मांडून बसतात. त्यामूळे बस वाहतुकीलादेखील मोठी समस्या होते. या समस्येला तोंड देण्यासाठी किरण गायचोर व त्यांच्या मित्रमंडळींनी हा ग्रुप तयार करून नागरिकांची प्रवासाची व्यवस्था केली होती.

भांडुपकरांची भेट घेत्यावळी खासदार मनोज कोटक यांच्यासोबत स्थानिक शिवसेना आमदार अशोक पाटील व विभागाच्या स्थानिक नगरसेविका साक्षी ताई दळवीसुद्धा उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित एस विभागाच्या महानगरपालिकेचे अधिकारी आरटीओ यांना खासदारांनी या समस्येविषयी सूचना केल्या. त्यानूसार वाहतूक समस्या लवकरात लवकर सोडण्यात येईल, असे महानगरपालिका व वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Intro:भांडुप करांनी नवनिर्वाचित खासदारां समोर वाहतूक समस्येचा पाढा वाचला.

ईशान्य मुंबईतील भाजपचे नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांनी नुकतीच भांडुप स्टेशन पश्चिम येथील वाहतूक समस्या संदर्भात भांडुपकरांची भेट घेतली यावेळी आम्ही भांडुप कर या तरुणांच्या टीमने त्यांना वाहतूक समस्याची अडचण सांगितले यावेळी खासदारांनी वाहतूक समस्या सोडवण्याचे चे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील व यावर पर्यायी मार्ग काढू व स्थानकाच्या बाहेरील समस्या सोडवू असे सांगितलेBody:भांडुप करांनी नवनिर्वाचित खासदारां समोर वाहतूक समस्येचा पाढा वाचला.

ईशान्य मुंबईतील भाजपचे नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांनी नुकतीच भांडुप स्टेशन पश्चिम येथील वाहतूक समस्या संदर्भात भांडुपकरांची भेट घेतली यावेळी आम्ही भांडुप कर या तरुणांच्या टीमने त्यांना वाहतूक समस्याची अडचण सांगितले यावेळी खासदारांनी वाहतूक समस्या सोडवण्याचे चे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील व यावर पर्यायी मार्ग काढू व स्थानकाच्या बाहेरील समस्या सोडवू असे सांगितले.

गेले काही महिने झाले आम्ही भांडुप कर या तरुणांनी निर्माण केलेल्या एका ग्रुप ने रिक्षा समस्या व बस समस्या यावर तोडगा काढण्यासाठी हे तरुण रोज सायंकाळी 6 ते 11 या वेळेत आपल्या कामाच्या सवडीनुसार भांडुप करांना रिक्षा व्यवस्था होईल याची काळजी घेत होते. भांडुप पश्चिम स्थानकाला फेरीवाला व रिक्षांच्या अवास्तव रांगा यामुळे येथून पायी चालणेही अवघड होऊन जाते. यावर प्रशासन वेळोवेळी जरी प्रयत्न करत असेल तरी फेरीवाले फुटपाथवर ठाण मांडून म् बसले आहेत. यावेळी बस वाहतुकीला देखील मोठी समस्या स्थानकाच्या बाहेर निर्माण होते. यावेळी किरण गायचोर व त्यांच्या मित्रमंडळींनी हा ग्रुप तयार करून नागरिकांची प्रवासाची व्यवस्था केली होती. याठिकाणी नुकतेच खासदार मनोज कोटक स्थानिक शिवसेना आमदार अशोक पाटील व विभागाच्या स्थानिक नगरसेविका साक्षी ताई दळवी उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित एस विभागाच्या महानगरपालिकेचे अधिकारी आरटीओ यांना खासदारांनी सूचना केल्या सूचना केल्या यानुसार वाहतूक समस्या लवकरात लवकर सोडण्यात येईल असे महानगरपालिका व वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्ग काढू असे यावेळी सांगण्यात आले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.