मुंबई : मुंबईत १३ ते १६ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या जी - २० परिषदेच्या बैठकीसाठी जय्यत तयारी सुरु (G 20 conference in Mumbai) आहे. जगभरातील परदेशी पाहुणे बैठकीला हजेरी लावणार आहेत. मुंबई महापालिकेसह मुंबई पोलीस देखील या बैठकीच्या जय्यत तयारीला लागले आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आज होणाऱ्या G 20 परिषदेच्या सुरक्षेबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी एक सूचना जारी केली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या आदेशानुसार दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते १२ डिसेंबर ते १६ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे या दिवशी प्रवासासाठी दुसरा मार्ग वापरा. जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने हे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे (G 20 conference in Taj Hotel in Mumbai) आहे.
सूचना जारी : वाहतूक पोलीसांनी कोणते मार्ग बंद राहतील याची सूचना जारी केली आहे. वाहनधारक कोणत्या पर्यायी मार्गाने जाऊ शकतात, याची माहितीही वाहतूक पोलीसांनी दिली (Traffic changes due to G 20 conference) आहे. वाहतूक पोलीसांच्या म्हणण्यानुसार, बंद राहणार्या रस्त्यावर कोणत्याही वाहनाच्या हालचालीवर बंदी असेल, परंतु रुग्णवाहिका सारख्या आपत्कालीन सेवा असलेली वाहने फिरू शकतील. अनेक रस्ते बंद झाल्यामुळे परिसरात अनेक ठिकाणी रस्ता जाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लोकांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गानेच प्रवास (security for G 20 conference ) करावा.
हे रस्ते बंद राहतील : 1) शिवाजी महाराज मार्ग, 2) पी रामचंदानी मार्ग, 3)बीके बोमन बेहराम मार्ग, 4)अॅडम स्ट्रीट वे, 5)महाकवी भूषण मार्ग हे रस्ते बंद राहणार आहेत. आज दुपारी 12 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत सर्व रस्ते बंद राहतील. रिगल जंक्शनपासून छत्रपती शिवाजी मार्ग जंक्शनपर्यंत बंद राहील. मात्र आपत्कालीन सेवांसाठी वाहने जाऊ शकतात, असे वाहतूक पोलीसांनी सांगितले. रीगल सर्कलपासून दक्षिणेकडील महाकवी भूषण मार्ग, ताज पॅलेस, बोमन, बेहरा रोड, अल्वा चौक, इलेक्ट्रिक हाऊस, आझमी रोड, भिड भंजन मंदिर मार्ग हे रस्ते खुले राहतील, असे वाहतूक पोलीसांनी (G 20 conference) सांगितले.