- मुंबई - पोर्नोग्राफिक कंटेट प्रकरणी अटकेत असलेला शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा याच्या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढ केली आहे. सविस्तर वृत्त -
- मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणी गुन्हे शाखेने घरावर धाड टाकल्यानंतर व्यावसायिक राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे जोरदार भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिल्पाने अक्षरश: रडून तिला पतीच्या कृत्यांची माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितल्याचे मुंबई पोलिसांतील सूत्रांनी म्हटले आहे. सविस्तर वृत्त -
- मुंबई - झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आमदारांना ५० कोटी रुपये आणि मंत्री पदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. सविस्तर वृत्त -
- टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरूष बॉक्सरांनी निराश केलं. परंतु, महिला बॉक्सरांनी विजयी प्रारंभ केला. मेरी कोमनंतर आता लवलिना बोर्गोहेन याने पहिला सामना जिंकला आहे. लवलिनाने राउंड ऑफ 16 च्या सामन्यात जर्मनीच्या नेदिन अपेत्झचा 3-2 ने पराभव केला. विशेष म्हणजे लवलिनाने अनुभवी अपेत्झचा पराभव करत ऑलिम्पिकमध्ये सुरूवात केली. सविस्तर वृत्त -
- नागपूर - आजवर मी झारखंडला गेलेलो नाही. झारखंडचा इतिहास, भूगोल, राजकारण मला माहित नाही. त्यामुळे मी झारखंड सरकार पडण्याच्या कटात असल्याचा आरोप कपोलकल्पित असल्याचे वक्तव्य भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यांचावर झारखंड सरकार पाडण्याचे आरोप झाल्यानंतर त्यांनी स्वतः पुढे येऊन प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वृत्त -
- टोकियो - वयाच्या ज्या वळणावर इतर लोक निवृत्ती घेतात, अशा वयात कुवैतच्या अब्दुल्ला अल रशिदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत, वय हे केवळ आकड्यांपुरते आहे, हे जगाला दाखवून दिले. अब्दुल्ला यांनी नेमबाजीत ही किमया साधली आहे. तसेच त्यांनी 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचा मनसुबा जाहीर केला. सविस्तर वृत्त -
- सातारा - सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी व भुस्खलनामुळे 416 गावे बाधित तर, 42 जण मृत आणि 6 जण बेपत्ता झाले आहेत. त्यांना शासनाकडून मदत मिळणार आहे. तथापि, अशा डेंजर झोनमध्ये राहणार्या लोकांचे सुरक्षीत ठिकाणी पुनवर्सन करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. सविस्तर वृत्त -
- नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसांनी सोमवारी वादग्रस्त आसाम-मिझोरम सीमेवर पुन्हा हिंसाचार भडकला. आसाममधील कछार जिल्हा आणि मिझोरम कोलासिब जिल्ह्याच्या सीमेवरील भागात गोळीबार झाला. यामध्ये 6 जवान ठार झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे. सविस्तर वृत्त -
- नवी दिल्ली - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. याचिकेची प्रत केंद्र सरकराला देण्याचे निर्देश कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. सक्तवसुली संचलनालय (ईडी) यांनी दिलेल्या समन्सला महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. सविस्तर वृत्त -
- टोकियो - भारतीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सलग दुसर्या पराभवाला सामोरे जावे लागले. सोमवारी जर्मनीने 2-0 असा पराभव केला. राणी राम पालच्या नेतृत्वात असलेल्या भारतीय संघाने जिंकण्याचे मोठे प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळू शकले नाही. या अगोदरही जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ नेदरलँडकडून 1-5 अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते. जर्मनीच्या टिमने सुरुवातीलाच चांगली आघाडी घेतली होती. सविस्तर वृत्त -
Top 10 @ 1 PM : दुपारी एकवाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... - imp news
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना, पाऊस यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 1 PM

Last Updated : Jul 27, 2021, 1:40 PM IST