ETV Bharat / state

आज 'भारत बंद' ... मुंबईत टॅक्सी-रिक्षासह 'या' सेवा राहाणार सुरू? - मुंबई भारत बंद बातमी

आज 8 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांकडून ‘भारत बंद’चा इशारा देण्यात आला आहे. परंतु मुंबईत अनेक सेवा सुरू राहणार आहे.

bharat band
'भारत बंद'
author img

By

Published : Dec 7, 2020, 7:55 PM IST

Updated : Dec 8, 2020, 6:36 AM IST

मुंबई - दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (8 डिसेंबर) रोजी शेतकऱ्यांकडून ‘भारत बंद’चा इशारा देण्यात आला आहे. 'भारत बंद'मध्ये काही व्यापारी संघटना सहभागी होणार नसल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांनी सांगितले आहे.

निर्णय ऐच्छिक -

एफआरटीडब्ल्यूएने महाराष्ट्रात बंद पुकारलेला नाही. बंद पाळायचा की नाही, हा निर्णय व्यापाऱ्यांनी घ्यायचा आहे. आम्ही यापुढे कोणत्याही व्यवसायाच्या नुकसानाला समर्थन देत नाही, अशी प्रतिक्रिया व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांनी दिली. नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी या शेतकऱ्यांची आहे. नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या बंदला आतापर्यंत अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे.

नवी मुंबई एपीएमसी बंद -

'भारत बंद'मध्ये नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटही सहभागी होणार आहे. भारत बंदला माथाडी कामगारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आज एपीएमसीमधील भाजी, फळ आणि कांदा-बटाटा मार्केट एक दिवस बंद राहणार आहे.

टॅक्सी रिक्षा सुरू -

मुंबईकरांची तारांबळ उडू नये, यासाठीच मुंबईतील रिक्षा, टॅक्सी सेवा सुरूच राहणार असल्याची माहिती मुंबई ऑटोरिक्षामेन युनियनचे नेते शशांक राव यांनी दिली. आम्ही संघटना म्हणून 'भारत बंद'ला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळेच नेहमीप्रमाणेच ऑटो आणि बसची सेवा सुरळीतपणे असेल, असेही ते म्हणाले. मुंबईच्या रस्त्यावर नेहमीप्रमाणेच टॅक्सी सेवा सुरू राहील. त्यामुळे संपाचा कोणताही परिणाम हा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी याआधीच लोकल ट्रेनची सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळेच मुंबईकरांचा सध्या प्रवास टॅक्सी, रिक्षा, बेस्टबस आणि एसटीच्या बसवर अवलंबून आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई टॅक्सीमेन युनियनचे ए.एल. क्वाड्रोज यांनी दिली.

विद्युत पुरवठा राहणार सुरळीत -

मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांना विद्युत पुरवठा सुरू राहिल, अशी माहिती अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. 'भारत बंद' दरम्यान आमची सेवा सुरळीतपणे सुरू राहील, असे एईएमएलमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Last Updated : Dec 8, 2020, 6:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.