मुंबई - गेहलोत यांनी आमदारांचा आत्मविश्वास गमावला आहे आणि त्यांचे सरकार अल्पमतात आले..कोरोना रुग्णांच्या संख्येने 12 लाखांचा टप्पा पार केला आहे.. आसाम पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून ३४६ कोटीची मदत.. यासह राज्य आणि देशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुगणांच्या संख्येत वाढच होत असून देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने 12 लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. तब्बल 45 हजार 720 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 129 जणांचा मृत्यू झाला.
वाचा सविस्तर -गेल्या 24 तासांत 45 हजार 720 जणांना संसर्ग ; तर 1 हजार 129 जणांचा बळी
गुवाहाटी - आसाममधील पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच प्रारंभिक रक्कम म्हणून 346 कोटी रुपये जाहीर करणार आहे. ईशान्येकडील या राज्यात पूरात 56 लाख लोकांना फटका बाधित बसला आहे. बुधवारी एका अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली.
वाचा सविस्तर -आसाममध्ये महापूराचे थैमान ; केंद्राकडून 346 कोटी रुपयांची मदत
खातिमा- भारत - नेपाळ सीमेवरील निर्मनुष्य भाग ठरवण्यात आलेल्या ठिकाणी अतिक्रमण करत कुंपण तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेपाळी नागरिकांना भारताच्या सशस्त्र सीमा बलाने रोखले. नेपाळी नागरिक मद्यधुंद अवस्थेत होते. सीमेवर असणाऱ्या 'पिलर क्रमांक 811' जवळ बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.
वााचा सविस्तर -उत्तराखंड: सशस्त्र सीमा बलाने नेपाळी नागरिकांना कुंपण तयार करण्यापासून रोखले
हैदराबाद- पाकिस्तान सुरुवातीपासून त्यांच्या सैनिकांनी भारताच्या भूभागात घुसखोरी केल्याचा इन्कार करत होते. जिहादी अतिरेक्यांनी भारताच्या भूभागात प्रवेश केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे होते. मात्र, पाकचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ आणि लेफ्टनंट जनरल मोहम्मद अजीज खान यांच्यात टेलिफोनवर झालेल्या संभाषणामुळे पाकिस्तानचे कारगील बाबतचे पितळ उघडे पडले.
वाचा सविस्तर - कारगिल युद्ध: टेलिफोन रेकॉर्डिंगमुळे पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर उघड
हैदराबाद- कारगिल युद्धात पाकिस्तानने भारतीय सैनिकांना दिलेल्या क्रुरतेच्या वागणुकीचे उदाहरण म्हणून कॅप्टन सौरभ कालिया यांच्या हौतात्म्याकडे पाहता येते. कॅप्टन सौरभ कालिया आणि अन्य 5 सहकारी पाकिस्तानच्या क्रौर्याचे शिकार झाले होते.
वाचा सविस्तर -कॅप्टन सौरभ कालिया यांचे वीरमरण ही पाकिस्तानच्या क्रुरतेची कहाणी
नवी दिल्ली - 'अगर वो मेरा नया-नवेला याक न होता तो शायद मै उसकी तलाश करने भी न जाता और शायद मै पाकिस्तानी घुसपैठियों को देख भी ना पाता.' हे शब्द आहेत 55 वर्षिय ताशी नामग्याल या मेंढपाळाचे. ज्यांनी मे 1999 मध्ये सर्वात आधी पाकिस्तानी सैनिक भारतातील जमिनीवर लपून बसल्याचे पाहिले होते. परिणामी भारताने कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानला हरवले आणि सैन्यांना मागे घ्यायला लावले.
वाचा सविस्तर -कारगिल विशेष: एका मेंढपाळामुळे भारतीय लष्कर झाले होते अलर्ट
मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची 10 हजार मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली ते त्यामधून बरेही झाले. मात्र, त्यांना कोरोना होऊन गेल्याची माहितीच नसल्याची धक्कादायक बाब थायरोकेयर लॅबने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आल्याची माहिती मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. आरोक्या स्वामी वेलुमानी यांनी दिली
वाचा सविस्तर - "10 हजार मुंबईकरांना कोरोना होऊन गेला, मात्र त्यांना माहितीच नाही"
नवी दिल्ली - राजस्थानच्या जनतेला उद्देशून एका खुल्या पत्राद्वारे भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या आपल्या पत्रात, ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे. त्यावरून हे स्पष्ट होते की, त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांचा आत्मविश्वास गमावला आहे आणि त्यांचे सरकार अल्पमतात आले आहे, असे सतीश पुनिया म्हणाले
वाचा सविस्तर -राजस्थान राजकीय नाट्य : 'गहलोत यांच्या पत्रानेच त्यांचे सरकार अल्पमतात असल्याचं दर्शवलं'
शिरुर (पुणे) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवारांबद्दल बकरी ईदसंबंधी आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिरुर पोलिसांनी एका व्यक्तीला तात्काळ अटक केली आहे.
वाचा सविस्तर -शरद पवारांबद्दल बकरी ईदसंबंधी आक्षेपार्ह पोस्ट आली अंगलट ; पोलिसांनी केली कारवाई
मुंबई- महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याचा आरोप वेळोवेळी काँग्रेसकडून केला जातो. काँग्रेसच्या ऊर्जा मंत्र्यांनी थेट महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षाला अंधारात ठेवून ऊर्जा कंपन्यातील आठ सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे.
वाचा सविस्तर - सेना-राष्ट्रवादीला डावलून काँग्रेसच्या ऊर्जा मंत्र्यांनी केल्या नियुक्त्या; मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता