ETV Bharat / state

Top News : वाचा एका क्लिकवर, टॉप न्यूज - आजच्या बातम्या

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

top news
टॉप न्यूज
author img

By

Published : Oct 17, 2021, 6:31 AM IST

आज दिवसभरात -

  • राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई - राज्यात परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजावला असतानाच अजून दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हा वेधशाळेने वर्तवला आहे. मागील दोन ते तीन दिवसात मराठवाड्यासह काही मागात पावसाने उघडीक दिली होती. त्यामुळे शेतीतील पिके काढणीला पून्हा सुरूवात झाली असतानांच पून्हा राज्यातील काही भागात आज (17 ऑक्टोबर) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दि. 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पून्हा सर्वत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

  • मंत्री बाळासाहेब पाटील आज कराडमध्ये

सातारा - मंत्री बाळासाहेब पाटील हे आज कराड दौऱ्यावर येत आहेत. पाटील आज कराडमधील विविध विकासकामांचे लोकार्पण करणार आहेत. आज सकाळी हा कार्यक्रम होणार आहे.

  • आयपीएलच्या नवीन संघांचा लिलाव आज

मुंबई - बीसीसीआय आज पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या दोन नवीन संघांसाठी ई-बिडिंग घेण्याची योजना आखत आहे. यासंदर्भातली माहिती पीटीआयने दिली आहे.

  • आजपासून सुरू होतोय Flipkart Big Diwali Sale

नवी दिल्ली - दिवाळीनिमित्ताने ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने बिग दिवाळी सेलची घोषणा केली आहे. आजपासून हा सेल सुरू झाला आहे. या सेल दरम्यान मोबाइल, टॅबलेट, टीव्ही आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्सवर खास ऑफर्स देण्याचा दावा केला आहे.

कालच्या घडामोडी -

  • नागपूर - जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून सर्वांसाठी विकासाचा मार्ग खुला झाला आहे. 370 नावावर जो भेदभाव मोठ्या प्रमाणात केला जात होता आता राहिला नाही, असे भाष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते नागपुरात पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

वाचा सविस्तर - कलम 370 हटल्याने काश्मीर घाटीत विकासाचे मार्ग खुले झाले - मोहन भागवत

  • मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट, तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन गेले काही दिवस 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. 11 ऑक्टोबरला 1736 रुग्णांची नोंद झाली होती. त्यात आणखी घट होऊन आज शनिवारी 16 ऑक्टोबरला 1553 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही महिन्यांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद आहे.

वाचा सविस्तर - corona update : राज्यात 1 हजार 553 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 26 रुग्णांचा मृत्यू

  • मुंबई - शंभर वर्षांपूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान आणि प्रबोधनकरांचा नातू असणे हे भाग्य आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

वाचा सविस्तर - प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • पिंपरी-चिंचवड - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारपरिषद घेत भाजपा, मोदी सरकार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाविकासआघाडीच्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तसेच, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असून, भाजपा नेत्यांकडून जोरादर टीका टिप्पणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देखील शरद पवार यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत वक्तव्यं केलं.

वाचा सविस्तर - ..अन् उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री, शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा.. केंद्र सरकारवर हल्लाबोल

  • मुंबई - अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोकडून (एनसीबी) शनिवारी मुंबईच्या विविध भागांत छापे टाकण्यात आले. ड्रग विक्रेत्यांविरोधात चालवलेल्या मोहिमेच्या पर्श्वभूमीवर एनसीबीने वांद्रे, अंधेरी आणि पोवई भागांत छापे टाकले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तसेच शनिवारी रात्री उशिरा एनसीबीने पालघरमध्येही छापा टाकला. यात 1 कोटी रुपये किंमतीचे 505 ग्रॅम एमडी जप्त केले आहे.

वाचा सविस्तर - ड्रग विक्रेत्यांविरोधात एनसीबीची कारवाई; मुंबईसह पालघरमध्येही छापे

  • वाचा राशीभविष्य -

17 ऑक्टोबर राशीभविष्य : धनू राशीसाठी आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास शुभ!

17 ते 23 ऑक्टोबर साप्ताहिक राशीभविष्य : कसा असेल तुमचा आठवडा? जाणून घ्या आचार्य पी खुराना यांच्याकडून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.