ETV Bharat / state

मुंबईकरांना दिलासा; आज कोरोनाचे 3876 नवे रुग्ण तर 70 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत गेल्या काही दिवस 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. सलग पाच दिवस रुग्णसंख्या 7 हजाराच्या घरात आढळून आली आहे. मुंबईत आज (सोमवार) 3 हजार 876 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 31 हजार 527 वर पोहचला आहे. आज (सोमवार) 70 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 12 हजार 853 वर पोहचला आहे.

मुंबई कोरोना रूग्णसंख्या
मुंबई कोरोना रूग्णसंख्या
author img

By

Published : Apr 26, 2021, 9:29 PM IST

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूचे 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. सलग पाच दिवस रुग्णसंख्या 7 हजाराच्या घरात आढळून आली आहे. गेल्या दोन दिवसात 5 हजाराच्या घरात रुग्ण आढळून आले. आज (सोमवारी) त्यात आणखी घट दिसून आली आहे. आज(सोमवारी) 3876 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 9 हजार 150 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.

9 हजार 150 रुग्णांना डिस्चार्ज

मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्णसंख्या कमी होत होती. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली. मुंबईत गेल्या काही दिवस 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. सलग पाच दिवस रुग्णसंख्या 7 हजाराच्या घरात आढळून आली आहे. मुंबईत आज (सोमवार) 3 हजार 876 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 31 हजार 527 वर पोहचला आहे. आज (सोमवार) 70 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 12 हजार 853 वर पोहचला आहे. 9 हजार 150 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 46 हजार 861 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 70 हजार 373 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 62 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 104 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 084 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज (सोमवारी) 28 हजार 328 तर आतापर्यंत एकूण 52 लाख 72 हजार 062 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग आहेत हॉटस्पॉट

मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या

गेल्या वर्षभरात 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123, 28 मार्चला 6923, 29 मार्चला 5888, 30 मार्चला 4758, 31 मार्चला 5394, 1 एप्रिल 8646, 2 एप्रिलला 8832, 3 एप्रिलला 9090, 4 एप्रिलला 11,163, 5 एप्रिलला 9857, 6 एप्रिलला 10030, 7 एप्रिलला 10428, 8 एप्रिलला 8938, 9 एप्रिलला 9200, 10 एप्रिलला 9327, 11 एप्रिलला 9989, 12 एप्रिलला 6905, 13 एप्रिलला 7898, 14 एप्रिलला 9925, 15 एप्रिलला 8217, 16 एप्रिलला 8839, 17 एप्रिलला 8834, 18 एप्रिलला 8479, 19 एप्रिलला 7381, 20 एप्रिलला 7214, 21 एप्रिलला 7684, 22 एप्रिलला 7410, 23 एप्रिलला 7221, 24 एप्रिलला 5888, 25 एप्रिलला 5542, 26 एप्रिलला 3876 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद

मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.