ETV Bharat / state

आज...आत्ता... गुरुवार ४ जुलै २०१९ दुपारी २ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - heavy rain

मानहानी प्रकरण : 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर राहुल गांधींना जामीन मंजूर.प्रियंका गांधींचा योगींवर निशाणा, म्हणाल्या ‘हाथ कंगन को आरसी क्या. जळगावात कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकरी दांपत्याची आत्महत्या.प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक निरापराधांचे जीव गेले - अशोक चव्हाण.तिवरे दुर्घटना वध की खून? अभिनेता जितेंद्र जोशीचा सवाल

आज...आत्ता... गुरुवार ४ जुलै २०१९ दुपारी २ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...
author img

By

Published : Jul 4, 2019, 1:54 PM IST

मानहानी प्रकरण : 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर राहुल गांधींना जामीन मंजूर.
मुंबई-
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी भाजप - रा. स्व संघाच्या विचारधारेचा कथित संबंध असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याबाबत अवमान याचिका दाखल केली होती. या दाव्यावरील सुनावणी माझगाव महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे आज झाली. यासाठी राहुल गांधी न्यायालयात हजर झाले होते. याचबरोबर सीताराम येचुरीदेखील येथे हजर झाले होते. 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर राहुल गांधींचा जामीन मंजूर झाला आहे. वाचा सविस्तर...

प्रियंका गांधींचा योगींवर निशाणा, म्हणाल्या ‘हाथ कंगन को आरसी क्या'
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील वाढत्या गुन्हेगारीवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.‘हाथ कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या’। या म्हणीवरून त्यांनी योगींवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...

जळगावात कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकरी दांपत्याची आत्महत्या
जळगाव - सततची नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून अमळनेर तालुक्यात असलेल्या पिळोदे गावातील एका तरुण शेतकरी दांपत्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. लोटन रामराव पवार (वय ३५) तसेच सुनीता लोटन पवार (वय ३३) अशी आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीची नावे आहेत. वाचा सविस्तर...

प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक निरापराधांचे जीव गेले - अशोक चव्हाण
मुंबई - प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रत्नागिरीतील तिवरे धरण फुटून अनेक निरापराधांचे जीव गेले असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करुन, नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी असेही चव्हाण म्हणाले. वाचा सविस्तर...

तिवरे दुर्घटना वध की खून? अभिनेता जितेंद्र जोशीचा सवाल
मुंबई - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेत २३ जण बेपत्ता झाले होते. यातील १४ जणांचे मृतदेह मिळाले आहेत. तर एनडीआरएफच्या पथकाची शोध मोहिम सुरू आहे. या घटनेनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. यात कलाकारांचाही समावेश आहे. वाचा सविस्तर...

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.