मुंबई - आज राज्यात 2752 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 9 हजार 106 वर पोहचला आहे. तर आज 45 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 50 हजार 785 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.18 टक्के, तर मृत्यूदर 2.53 टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
44 हजार 831 अॅक्टिव्ह रुग्ण -
राज्यात आज 1743 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 12 हजार 264 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 42 लाख 7 हजार 595 नमुन्यांपैकी 20 लाख 9 हजार 106 नमुने म्हणजेच 14.14 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 8 हजार 993 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 44 हजार 831 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
या दिवशी सर्वात कमी रुग्ण -
राज्यात गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यांत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 17 नोव्हेंबरला 2 हजार 840 तर 18 जानेवारीला 1 हजार 924 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा - ईडी हे राजकीय हत्यार झाले; रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका